“माणसांसकट एका तासात सगळं जाळेन” वाल्मिक कराडच्या समर्थकाची दादागिरी; Video Viral

संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या साथीदाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
Beed News
Beed News

संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड सध्या अटकेत असून त्याच्यावरील कारवाईची सुनावणी पार पडत आहे. अशातच वाल्मिक कराडच्या साथीदाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. बीडमधील वाल्मीक कराडचा साथीदार सुग्रीव कराडची गुंडगिरी करतानाच्या व्हिडीओने एकच खळबळ उडाली आहे.

वाल्मीक कराडचा साथीदार सुग्रीव कराड या व्हिडिओमध्ये माणसा सकट एका तासात सगळं जाळण्याची धमकी देताना पाहायला मिळाला. तसेच सुग्रीव कराडने मस्साजोगच्या देशमुख नामक तरुणाला उमरी टोल नाक्यावर धमकी देत त्याच्यावर हल्ला केल्याची ही माहिती समोर आली आहे.

हेही वाचा- ‘राम पूर्णेकर यांनी काही गोष्टी डोळ्यांनी..’ मीनाक्षी शिंदे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत यांचे स्पष्टीकरण

समोर आलेल्या माहितीनुसार, सुग्रीव कराडने टोल‌ न भरल्याने हा वाद झाला. याच टोलनाक्यावरून कराड टोळीने संतोष देशमुखांचे अपहरण करून त्यांनी हत्या केली होती. यानंतर याच टोलनाक्यावर कराडच्या साथीदाराने मस्साजोग गावातील एका देशमुख नामक तरुणावर हल्ला केल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

हा धक्कादायक व्हिडिओ काही दिवसांपूर्वीचा असल्याची माहिती समोर आली आहे. इतकचं नव्हे तर याच सुग्रीव कराड आणि वाल्मीक कराडची तीन दिवसांपूर्वी एक कॉल रेकॉर्डिंग वायरल झाली होती, ज्यामध्ये खासदार सोनवणेंच्या मुलाला खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचल्याचे समोर आले होते.

दरम्यान बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरणानंतर विलास घुले प्रकरणानेही खळबळ उडाली आहे. दोन गटात सुरू असलेलं भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुले नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव येत असून खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version