Sunday, July 13, 2025 10:22:45 AM

वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांना भुमरेंचे निवेदन

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयातील दोन अधिकाऱ्यांची गेल्या सहा महिन्यांपासून छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांना भुमरेंचे निवेदन

विजय चिडे, प्रतिनिधी;छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयातील दोन अधिकाऱ्यांची गेल्या सहा महिन्यांपासून छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे पाचोड येथे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी दोन्हीही वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते धनराज भुमरे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदनाद्वारे केली आहे.

सामाजिक कार्यकर्ते धनराज भुमरे यांनी निवेदनात असे म्हटले की, धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पैठण तालुक्यातील पाचोड हे सर्वाधिक मोठे बाजारपेठेचे गाव असल्याने येथे शासनाने लोककल्याणकारी संकल्पना लक्षात घेऊन तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय तर दहा खाटांचे ट्रॉमा केअर सेंटर उभारले. येथे चोवीस तास रुग्णांवर तातडीने उपचारसेवा मिळणे अपेक्षित आहे. परंतु मागील काही महिन्यांपासून पाचोड (ता.पैठण) येथील ग्रामीण रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रतिनियुक्ती करण्यात आली असल्याने त्याचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसला आहे.

हेही वाचा: नराधम बापाचा मुलीवर अत्याचार; लोणावळ्यातील धक्कादायक घटना
पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये परिसरातील शेकडो गोरगरीब रुग्ण दररोज येथे उपचार घेण्यासाठी येत असतात. तर महिनाभरात चाळीसपेक्षा अधिक महिलांची प्रसुती या ठिकाणी होत असते. मात्र मागील महिनाभरापासून रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये प्रतिनियुक्ती आहे, तर अस्थी रोग तज्ञ वैद्यकीय अधिकारीही प्रतिनियुक्तीवर आहेत. यामुळे रुग्णालयात अनेक रुग्णांना याचा फटका बसत आहे. तरी प्रशासनाने त्वरित या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती रद्द करावी, अन्यथा पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयाला थेट कुलूप ठोकण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते धनंजय भुमरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.


सम्बन्धित सामग्री