Wednesday, June 18, 2025 03:10:36 PM

'आरोपीकडून तब्बल 300 कोटी मागितले, हे अधिकारी फॉल्टी...' आमदार सुरेश धस यांचा सुपेकरांवर गंभीर आरोप

वैष्णवी हगवणे प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधिकारी सुपेकरांवर 300 कोटींच्या मागणीचे गंभीर आरोप केले. जनतेत संताप; तातडीने चौकशीची मागणी.

आरोपीकडून तब्बल 300 कोटी मागितले हे अधिकारी फॉल्टी  आमदार सुरेश धस यांचा सुपेकरांवर गंभीर आरोप

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरून राज्यभरात खळबळ उडाली असतानाच भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकारी सुपेकरांवर गंभीर आरोप केला आहे. धस यांनी एका जाहीर कार्यक्रमात दावा केला की, सुपेकर यांनी जेलमध्ये असलेल्या आरोपींकडून तब्बल 300 कोटी रुपयांची मागणी केली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून यामुळे पोलीस यंत्रणेवरील विश्वास डळमळीत होतो, असं ते म्हणाले.

धस यांनी सांगितलं की, माझ्याकडे अशी तक्रार आली आहे की सुपेकर यांनी आरोपींना भेटून त्यांच्याकडून पैसे मागितले. नातेवाईकांच्या सुनेकडून जर पोलीस पैसे मागत असतील, तर त्यांच्यात मुळातच नैतिकता उरलेली नाही. हे अधिकारी फॉल्टी आहेत. या प्रकरणात गुंतलेल्यांकडे दीडशे कोटींची प्रॉपर्टी आहे, पण आता त्याचं काय करायचं? लोक यांच्यावर शेण फेकतील, टमाटे फेकतील, पण यावर काही फरक पडणार नाही. त्यामुळे हे लोक जेव्हा जेलमधून जामिनावर बाहेर येतील, तेव्हा त्यांच्यासाठी कवट तयार ठेवा, असं आवाहन त्यांनी केलं.

हेही वाचा: लातूरच्या अपूर्वाचे आ. रोहित पवारांनी स्वीकारले पालकत्व : शारदाबाई पवार शाळेत प्रवेश

धस यांनी जाहीरपणे बोलताना स्पष्ट केलं की, हगवणे कुटुंबातील सदस्य बाहेर आले तर आष्टी मतदारसंघातील लोकांनी त्यांच्यासाठी गाडी आणि कवट तयार ठेवावे. या प्रकारामुळे सामान्य जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. हे लोक आता जनतेसमोर उभं राहण्यास पात्र नाहीत. समाजाच्या आणि कायद्याच्या विरोधात जाऊन वागत असलेल्या लोकांना शिक्षा मिळायलाच हवी, असा रोखठोक संदेश धस यांनी दिला.

धस यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे. त्यांच्या भाषेचा स्वर आक्षेपार्ह असल्याची टीका देखील काही स्तरांतून होत आहे. परंतु त्यांच्या मते, अशा गंभीर प्रकरणांमध्ये थेट आणि कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे. सुपेकरांवर लावण्यात आलेला 300 कोटींचा आरोप अत्यंत गंभीर आहे आणि या प्रकरणाची तातडीने चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी होत आहे.


सम्बन्धित सामग्री