BJP Maharashtra : महापालिका निवडणुकीत भाजपची मोठी रणनीती, 20 ते 25 टक्के नगरसेवकांचा पत्ता कट?

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवार निवडीत कडक धोरण स्वीकारले आहे.

BJP Maharashtra : महापालिका निवडणुकीत भाजपची मोठी रणनीती, 20 ते 25 टक्के नगरसेवकांचा पत्ता कट?

नागपूर : येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवार निवडीबाबत कडक भूमिका घेतल्याची माहिती समोर येत आहे. नागपूरसह राज्यभरात सुमारे 20 ते 25 टक्के सिटिंग नगरसेवकांना यावेळी उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता आहे. प्रभागातील कामकाज, पक्षासाठी केलेली मेहनत आणि स्थानिक पातळीवरील सक्रियता या निकषांवर उमेदवारांची छाननी केली जाणार आहे.
 
विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांत स्वतः सक्रिय न राहता प्रभागातील काम पती किंवा नातेवाईकांकडे सोपवणाऱ्या महिला नगरसेविकांनाही यावेळी तिकीट नाकारले जाऊ शकते. महिलांसाठी 50 टक्के जागा राखीव असल्या तरी केवळ ओळख किंवा कुटुंबातील राजकीय पार्श्वभूमीच्या आधारावर उमेदवारी दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश पक्षाकडून देण्यात येत आहे.

हेही वाचा: IND vs SA 5th Match : दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सामन्यापूर्वी संजू सॅमसनकडे अखेरची संधी; बुमराहबाबत काय माहिती?

 
नागपूरसारख्या शहरांमध्ये अनेक वर्षे सत्तेत राहिल्याने निर्माण होणाऱ्या anti-incumbency चा सामना करण्यासाठी भाजपने नव्या चेहऱ्यांवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. याच कारणामुळे पक्षाने यंदा उमेदवार निश्चित करण्यापूर्वी विविध प्रभागांमध्ये तीन टप्प्यांत सर्व्हे करून घेतले. या सर्व्हेमधून संभाव्य विजयी उमेदवार, विरोधी पक्षाची ताकद आणि नव्याने पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांची स्वीकारार्हता तपासण्यात आली आहे.
 
दरम्यान, महापालिका निवडणुका भाजप आणि शिवसेना युतीतून लढवण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. मुंबई आणि पुण्यात दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाबाबत बैठका पार पडल्या असून, मुंबईत सुमारे 150 जागांवर एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. या चर्चांमध्ये भाजपकडून अमित साटम, तर शिवसेनेकडून उदय सामंत सहभागी झाले होते. पुण्यातही मुरलीधर मोहोळ आणि विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक झाली.
 
विधानसभा निवडणुकांतील यशानंतर भाजपच्या नेत्यांमध्ये महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांबाबत आत्मविश्वास दिसून येत आहे. राज्यातील महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, 23 डिसेंबरपासून नामनिर्देशन प्रक्रिया सुरू होणार आहे. 15 जानेवारीला मतदान होणार असून, 16 जानेवारीला निकाल जाहीर होतील. या निवडणुकांत भाजपचा नवीन उमेदवार फॉर्म्युला किती प्रभावी ठरतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: शत्रूची भूमी, मैदानंही त्यांचचं; पण पठ्ठ्यानं परिधान केली भारतीय जर्सी…, डौलानं फडकवला तिरंगा!

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number