सोलापुरात भाजपा-शिवसेनेतील धुसपूस समोर

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत असतात. त्यात राज्यात युती सरकार असणाऱ्या भाजपा-शिवसेनेत धुसपूस निर्माण होत असल्याचे समोर येत आहे. कल्याणनंतर सोलापूर जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेनेमधील धुसपूस समोर आली आहे. पालकमंत्री विखे पाटील वेळ देत नसल्याचा शिवसेना माढा लोकसभा संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी आरोप केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील प्रशासनाला फक्त भाजपच्याच लोकांची काम करा असा […]

सोलापुरात भाजपा-शिवसेनेतील धुसपूस समोर

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत असतात. त्यात राज्यात युती सरकार असणाऱ्या भाजपा-शिवसेनेत धुसपूस निर्माण होत असल्याचे समोर येत आहे. कल्याणनंतर सोलापूर जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेनेमधील धुसपूस समोर आली आहे. पालकमंत्री विखे पाटील वेळ देत नसल्याचा शिवसेना माढा लोकसभा संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी आरोप केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील प्रशासनाला फक्त भाजपच्याच लोकांची काम करा असा लिखित आदेश दिल्याचा आरोप संजय कोकाटे यांनी केलेला आहे. जिल्हास्तरीय समितीच्या नेमणुका अद्याप झालेल्या नाहीत. जर एकनाथ शिंदे बरोबर आले नाही तर भाजपाची काय अवस्था होईल, याचा त्यांनी विचार करावा असा सल्ला भाजप नेतृत्वाला दिलेला आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number