मोठी बातमी! पुणे शिक्षक मतदारसंघावर भाजपकडून शिक्कामोर्तब; राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वाट्याला काय?

पुणे शिक्षक मतदारसंघावरून भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये सुरु रस्सीखेच होती. असं असताना मोठी बातमी समोर येत आहे.
Pune Teachers Constituency
Pune Teachers Constituency

सध्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचं बिगूल वाजत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघावरून भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये सुरु रस्सीखेच होती. असं असताना मोठी बातमी समोर येत आहे. अखेर विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरला आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची कोणती जागा कोणाच्या वाट्याला जाणार हे आता समोर आलं आहे. यात शिवसेना शिंदे गटाला मोठा झटका बसला आहे.  यावेळी पुणे शिक्षक मतदारसंघ अखेर भाजपच्या वाट्याला गेले असून भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांकडून नावांची यादी वरिष्ठ नेतृत्वाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. वरिष्ठ पातळीवरील दीर्घ चर्चेनंतर पुणे शिक्षक मतदारसंघ अखेर भाजपच्याच वाट्याला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा- ज्ञानेश कुमारांनंतर निवडणूक आयोगात दुसरा मोठा वाद; IT विभागाच्या फाईल्सवरून 2 निवडणूक आयुक्त आक्रमक

यासंदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडे तीन जागांवरील 15 संभाव्य नावांची यादी सुपूर्द झाली असल्याची माहिती समोर आली आहे.  प्रत्येक जागेसाठी 5 नावांचा पर्याय तर 3 जागांसाठी एकूण 15 नावांची यादी सादर होणार आहे. दरम्यान पुणे पदवीधर, पुणे शिक्षक व नागपूर पदवीधर भाजप लढणार असून अमरावतीची जागा शिवसेनेला आणि छत्रपती संभाजीनगर राष्ट्रवादीच्या वाट्याला आले आहे.

अखेर महायुतीच्या एकमतानुसार भाजपच पुणे शिक्षक लढणार आहे. पुणे शिक्षक मतदारसंघावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांतील अनेक स्थानिक इच्छुकांनी दावा ठोकला होता. आता ही जागा भाजपच्या खात्यात गेल्यामुळे मित्रपक्षांतील इच्छुकांमध्ये काही प्रमाणात नाराजी पाहायला मिळत आहे. याबाबत शिवसेना व राष्ट्रवादी मधील इच्छुकांची समजूत काढण्याचा प्रयत्न होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version