Friday, March 13, 2026 07:54:00 AM

Solapur ZP election result 2026 : भाजपच्या सातपुतेंनी गुलाल उधळत साधला विजय; सोलापुरात विद्यमान खासदार-आमदारांना पराभवाचा धक्का

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचा निकाल समोर आला असून एकाच वेळी दोन मोठ्या नेत्यांना धक्का बसला आहे.

solapur zp election result 2026  भाजपच्या सातपुतेंनी गुलाल उधळत साधला विजय सोलापुरात विद्यमान खासदार-आमदारांना पराभवाचा धक्का

राज्यभरात 7 फेब्रुवारीला 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांसाठी मतदान पार पडले. या निवडणुकांचे निकाल आज, सोमवारी जाहीर होत आहेत. यासाठी सकाळी 10 पासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात एकूण 66.28 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. पुण्यात 68.35 टक्के मतदानाची नोंद झाली. राज्यातील एकूण 1 कोटी 41 लाख 90 हजार 211 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. 

हेही वाचा- Dhoki Panchayat Result 2026 : उद्धव ठाकरे यांचा उमेदवार ढोकी पंचायत समितीत फक्त एका मताने जिंकला

सोलापुरातील माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये विद्यमान खासदार आणि आमदार यांनी एकत्र येत भाजपला आव्हान दिलं होतं. त्यामुळे सोलापुरातील माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली. अशातच सोलापूर जिल्हा परिषदेचा निकाल समोर आला असून एकाच वेळी दोन मोठ्या नेत्यांना धक्का बसला आहे. माळशिरस तालुक्यातून खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भाजपचे राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती यांनी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांचा पराभव करत विजयाचा गुलाल उधळला. तर माळशिरसमधील गुरसाळे गणातून अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत भाजपने मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात गुलाल उधळला. हाय व्होल्टेज ड्रामा रंगलेल्या दहिगाव जिल्हा परिषद गटामध्ये भाजपने मारली मुसंडी मारली. माळशिरस तालुक्यातील दहिगाव जिल्हा परिषद गटाकडे बिग फाईट म्हणून पाहण्यात आले. 


सम्बन्धित सामग्री