Saturday, February 14, 2026 04:06:33 AM

BMC Election 2026: शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचाराला बॉलिवूडची अभिनेत्री उतरली थेट मैदानात; शिवसैनिकांची अलोट गर्दी

एका प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीनं थेट रस्त्यावर उतरून एका विशिष्ट राजकीय विचारधारेला पाठिंबा दिल्यानं सोशल मीडियावर चर्चेचा धुरळा उडाला आहे.

bmc election 2026 शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचाराला बॉलिवूडची अभिनेत्री उतरली थेट मैदानात शिवसैनिकांची अलोट गर्दी

महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता विजयाचा गुलाल कोण उधळणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानापूर्वीचा कालचा रविवार प्रचारासाठी महत्वाचा रविवार ठरला. त्यामुळेच सकाळपासूनच मुंबईच्या गल्लीबोळांपासून ते मोठ्या मैदानांपर्यंत राजकीय शक्तीप्रदर्शनाचा महापूर आल्याचं पाहायला मिळालं. रॅली, पदयात्रा आणि कोपरा सभांच्या माध्यमातून मतदारांना साद घालण्यासाठी सर्वच उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.

प्रचाराच्या या अंतिम टप्प्यात केवळ स्थानिक नेतेच नाही, तर ग्लॅमरस चेहऱ्यांच्या एन्ट्रीने निवडणुकीत वेगळीच रंगत भरली आहे. एका बाजूला विकासकामांचे आकडे मांडले जात असताना, दुसरीकडे भावनिक साद घालत मतदारांची मनं जिंकण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अशातच एका प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीनं थेट रस्त्यावर उतरून एका विशिष्ट राजकीय विचारधारेला पाठिंबा दिल्यानं सोशल मीडियावर चर्चेचा धुरळा उडाला आहे. त्या अभिनेत्रीच्या उपस्थितीनं कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारलं असून, तिचे फोटो सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत.

हेही वाचा: Nashik Election 2026: राज ठाकरेंनी मारला 'लाकूडतोड्या'चा टोला, महाजनांनी दाखवला 'ग्रीन नाशिक'चा आरसा; नाशिकचं राजकारण तापलं

मुंबईतील होत असलेल्या या लढतीत 'शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)' पक्षाच्या उमेदवारांसाठी अभिनेत्री रवीना टंडनने मैदानात उडी घेतली आहे. "मशाल" या चिन्हाचा प्रचार करण्यासाठी आयोजित केलेल्या भव्य रोड शोमध्ये चाहत्यांची अलोट गर्दी उसळली होती. केवळ एक सेलिब्रिटी म्हणून नव्हे, तर एक जागरूक नागरिक म्हणून रवीनाने यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली. "महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता टिकवण्यासाठी जे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत, त्याला साथ देणं माझं कर्तव्य आहे," अशा शब्दांत तिने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला.

राजकीय विश्लेषकांच्या मते, रवीना टंडनचा हा सहभाग केवळ गर्दी खेचण्यापुरता मर्यादित नसून, तो महिला आणि तरुण मतदारांच्या निर्णयावर प्रभाव पाडू शकतो. प्रचारादरम्यान त्यांनी संकटकाळात झालेल्या कामाचा आवर्जून उल्लेख केला, जो थेट कोविड काळातील व्यवस्थापनाशी जोडला जात आहे. मुंबईच्या नागरी समस्या, आरोग्य आणि शिक्षण या विषयांवर त्यांनी मांडलेली मतं मतदारांना विचार करायला भाग पाडणारी ठरत आहेत. यामुळेच 'उबाठा' गटासाठी रवीनाचा पाठिंबा या निवडणुकीत 'गेमचेंजर' ठरू शकतो.

हेही वाचा: Pune Election 2026: आता पुण्यात जमिनीखाली धावणार गाड्या! मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला 32 हजार कोटींचा प्लॅन


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या