BMC Exit Poll Result 2026 : मुंबईत सत्तापालट? तर ठाण्यात शिंदेंनी गड राखला; एक्झिट पोल्सचे आकडे समोर

15 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी जेव्हीसी, एक्सिस माय इंडियाआज तक, प्राब आणि जनमत यांचे एक्झिट पोल्सचे कल समोर आले आहेत.

BMC Exit Poll Result 2026 : मुंबईत सत्तापालट? तर ठाण्यात शिंदेंनी गड राखला; एक्झिट पोल्सचे आकडे समोर

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 202526 अंतर्गत आज, 15 जानेवारी 2026 रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया शुक्रवार, 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून विविध ठिकाणच्‍या 23 मतमोजणी कक्षात होणार आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. आज, 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. मात्र मतदान होण्यापूर्वीच राज्यातील तब्बल 66 उमेदवार विजयी झाले आहेत. हे 66 उमेदवार बिनविरोध निवडणून आल्याने त्यांच्या गळ्यात निवडणुकीशिवायच विजयी माळ पडली आहे. निवडणुका बिनविरोध करण्यात भाजपाने आघाडी घेतली आहे.

हेही वाचा- Municipal Election 2026 : निकालाआधीच 66 उमेदवार विजयी; कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार?, पहा संपूर्ण माहिती

यात भाजपाचे 44 उमेदवार बिनविरोध विजयी झाले असून त्यापाठोपाठ निवडणुका बिनविरोध करण्यात शिंदेंच्या शिवसेनेने दुसरा क्रमांक पटकावला आहे. शिंदेंच्या शिवसेनेते तब्बल 19 नगरसेवक बिनविरोध विजयी झालेत. आता राज्यातील जनतेचं 16 तारखेच्या निकालावर लक्ष लागलेलं आहे. दरम्यान मुंबई मनपाच्या 227 जागांमध्ये बहुमताचा आकडा 114 आहे. त्याआधी 15 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी जेव्हीसी, एक्सिस माय इंडियाआज तक, प्राब आणि जनमत यांचे एक्झिट पोल्सचे कल समोर आले आहेत. अंदाजानुसार कोणाचा महापौर होणार? कोणाचे जास्त नगरसेवक निवडून येणार आणि कोणता पक्ष महानगरपालिका निवडणुकांवर आपला झेंडा रोवणार हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे. 

एक्झिट पोल्सचे अंदाज काय आहेत?
जेडीएस एक्झिट पोल

शिवसेना शिंदे- 69 ते 76 
भाजपाला- 26 30
ठाकरे बंधू युती- 2 ते 3 
राष्ट्रवादी शरद पवार- 12 ते 16 
राष्ट्रवादी अजित पवार- 6 ते 8 
कॉंग्रेस- 1 ते 2 

डीव्ही रिसर्च
महायुती भाजपा शिवसेना शिंदे- 107 ते 122 जागा
ठाकरे बंधू युती- 68 ते 83 जागा

अ‍ॅक्सिस माय इंडिया
भाजप शिवसेना- 131 ते 151
ठाकरे बंधू- 58 ते 68
काँग्रेस- 12 ते 16 जागा

जेव्हीसी (JVC)
भाजप शिवसेना- 138
ठाकरे बंधू- 59
काँग्रेस- 23

पोल्स ऑफ पोल्स
भाजप शिवसेना- 107 ते 122
ठाकरे बंधू- 68 ते 83
काँग्रेस व वंचित- 11 ते 25
इतर- 8 ते 15

जनमत
भाजप शिवसेना- 42 ते 45
ठाकरे बंधू- 34 ते 37
काँग्रेस वंचित- 13 ते 15
इतर- 6 ते 8 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number