ईSSS… बोरिवलीत धक्कादायक प्रकार! डोश्यात सापडला मृत उंदीर; ग्राहकाला उलट्या, किळसवाणा VIDEO व्हायरल

बोरिवलीतील राधाकृष्ण हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर आढळल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
ईSSS… बोरिवलीत धक्कादायक प्रकार! डोश्यात सापडला मृत उंदीर; ग्राहकाला उलट्या, किळसवाणा VIDEO व्हायरल

मुंबईच्या बोरिवली पश्चिम परिसरातून अन्नाच्या स्वच्छतेबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बोरिवली रेल्वे स्थानकाजवळील एल.टी. रोडवरील राधाकृष्ण हॉटेलमध्ये डोशामध्ये मृत उंदीर आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारानंतर संबंधित ग्राहकाला उलट्या झाल्याची माहिती समोर आली असून, घटनेमुळे हॉटेलमधील स्वच्छतेचा मुद्दा चर्चेत आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमित त्रिवेदी हे आपल्या दोन भावांसह आणि मुलासोबत दक्षिण भारतीय पदार्थ खाण्यासाठी राधाकृष्ण हॉटेलमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी म्हैसूर मसाला डोसा मागवला. काही घास खाल्ल्यानंतर डोशामध्ये छोटा मृत उंदीर आढळल्याचा दावा अमित त्रिवेदी यांनी केला आहे.

पुण्यात खळबळ! बँक ऑफ इंडियाच्या इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू

खाद्यपदार्थात हा प्रकार दिसून येताच अमित त्रिवेदी यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांना उलट्या होऊ लागल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर त्यांनी तातडीने बोरिवली पोलिसांशी संपर्क साधून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.

हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ तयार करताना स्वच्छतेचे नियम पाळले जातात का, अन्नपदार्थांची साठवणूक कशा पद्धतीने केली जाते आणि स्वयंपाकघराची स्वच्छता किती नियमितपणे केली जाते, असे प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अन्नामध्ये अशा प्रकारची वस्तू आढळल्याचा दावा झाल्याने हॉटेलच्या अन्न सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणात संबंधित प्रशासनाकडून तपासणी केली जाते का, याकडे आता लक्ष लागले आहे. अन्न व औषध प्रशासन तसेच महापालिका प्रशासनाकडून हॉटेलची पाहणी करून अन्नाचे नमुने किंवा स्वच्छतेशी संबंधित बाबी तपासल्या जातात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मेडिकल स्टोअरच्या आडून नशेच्या औषधांची विक्री? कळंबोलीत मोठी कारवाई, तिघांना अटक

या घटनेनंतर हॉटेल प्रशासनाची बाजू आणि या आरोपाबाबत त्यांचे स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही. तसेच ग्राहकाला नेमका कोणता त्रास झाला आणि त्यासाठी वैद्यकीय तपासणी करण्यात आली का, याबाबतही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.

अन्नपदार्थांबाबत ग्राहकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या या घटनेची प्रशासनाकडून चौकशी झाल्यास नेमका प्रकार स्पष्ट होऊ शकतो. सध्या मात्र बोरिवलीतील या घटनेमुळे खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version