Sunday, July 13, 2025 11:05:30 AM

उल्हासनगरात नाल्यावरील पूल कोसळतानाची घटना सीसीटीव्हीत कैद

उल्हासनगरात नाल्यावरील पूल कोसळला आहे. पूल कोसळतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गणेशनगर भागात नाल्यावरचा पूल कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

उल्हासनगरात नाल्यावरील पूल कोसळतानाची घटना सीसीटीव्हीत कैद

कल्याण: उल्हासनगरात नाल्यावरील पूल कोसळला आहे. पूल कोसळतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गणेशनगर भागात नाल्यावरचा पूल कोसळल्याची माहिती समोर आली आहे. 

गणेशनगर भागातील हा पूल कोसळल्याने 500 पेक्षा जास्त घरांचा येण्या-जाण्याचा रस्ता बंद झाला आहे. या पुलाची मागील काही वर्षांपासून दुरावस्था झाली होती. मात्र उल्हासनगर महापालिकेनं त्याकडे दुर्लक्ष केल्यानं रविवारी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास हा पूल कोसळला. हा पूल कोसळल्याने 500 घरांचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला असून पालिकेच्या कारभारावर स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय.

हेही वाचा : शालेय शिक्षणमंत्र्यांची 'सरप्राईज व्हिजीट', पहिल्याच दिवशी शाळेतील धक्कादायक प्रकार समोर

उल्हासनगरात नाल्यावरील पूल कोसळल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यामुळे 500 पेक्षा जास्त घरांचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील गणेश नगर भागात नाल्यावरील पूल कोसळल्याची घटना घडली आहे. पुल कोसळतानाची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सुदैवानं यात कुणालाही इजा झालेली नाही.

रविवारी पुण्यातील मावळ परिसरातील कुंडमळ येथे 30 वर्ष जुना पूल कोसळला आहे. या घटनेत चौघांचा मृत्यू झाला असून 51 जण जखमी झाले आहेत. रविवार असल्यानं कुंडमळा येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली. रविवारी दुपारी 3:30 वाजता कुंडमळा येथे इंद्रायणी पूल कोसळला. दुर्घटनेत सुमारे 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती मिळाली. तत्परतेनं एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आलं. एनडीआरएफनं समयसूचकता दाखवत 38 जणांना वाचवलं. तपासात दोन जणांचे मृतदेह मिळाले. शासनाने मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमींचा खर्चही शासनानं उचलला. तपास यंत्रणेला स्थानिकांनी मोठं सहकार्य केलं. कुंडमळा पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नागपूरच्या जुनी कामठीच्या पुलाचंही स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. 


सम्बन्धित सामग्री