नाशिक : आजपासून राज्यभरातील शाळा सुरु झाल्या असून ठिकठिकाणी विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी अचानक बागलाण तालुक्यातील ढोलबारे येथील शाळेला ‘सरप्राईज व्हिजीट’ दिली आणि तिथे धक्कादायक प्रकार समोर आला. शाळेची पटसंख्या 195 असताना पहिल्या दिवशी केवळ 30 विद्यार्थीच हजर होते. एवढेच नव्हे, तर एकही शिक्षक उपस्थित नव्हता. दुसरीकडे शाळेत स्वच्छतेअभावी सर्वत्र धूळ पसरली होती. तर स्वच्छता गृहाची अवस्थाही दयनीय होती. हे दृश्य पाहून मंत्री भुसे चांगलेच संतापले आणि मंत्री भुसे यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले.
शाळेचा पहिला दिवस राज्यभरात उत्साहाचे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांचे औक्षण, फुगे, रांगोळ्या, ढोल-ताशे – सर्वत्र स्वागताचा जल्लोष दिसून आला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री, आमदार, खासदारांनी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे स्वतः आदिवासी भागात पोहोचले. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत त्यांचा पहिला दिवस खास केला. मात्र परतीच्या मार्गावर त्यांनी अचानक बागलाण तालुक्यातील ढोलबारे येथील शाळेला ‘सरप्राईज व्हिजीट’ दिली आणि धक्कादायक प्रकार समोर आला.
हेही वाचा : Chhatrapati Sambhajinagar Crime: भरदिवसा चाकूचा धाक दाखवत महिलेला लुटले
शाळेची पटसंख्या 195 असताना पहिल्याृ दिवशी केवळ 30 विद्यार्थीच हजर होते. एवढेच नव्हे, तर एकही शिक्षक उपस्थित नव्हता. बाहेरून रंगरंगोटी केलेली मॉडेल शाळा आतून मात्र शिक्षणापासून कोसळलेली होती. त्या ठिकाणी 195 पटसंख्या असताना केवळ 30 चं विद्यार्थी हजर होते तर शिक्षक चक्क गैरहजर होते. दुसरीकडे शाळेत स्वच्छतेअभावी सर्वत्र धूळ पसरली होती. स्वतः भुसे यांनी धूळ हाताने साफ करून दाखवली. तर स्वच्छतागृहाची अवस्थाही दयनीय होती. हे दृश्य पाहून मंत्री भुसे चांगलेच संतापले. मंत्री भुसे यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले असून, संबंधितांची जबाबदारी ठरवण्याचे निर्देशही दिले आहेत. दरम्यान, शाळेच्या पहिल्या दिवशीच एकीकडे आनंदोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे मात्र शिक्षकांचीच उदासीनता असल्याचे चित्र शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनाचं अनुभवायला मिळाल्याने शिक्षण क्षेत्रातील सावळा गोंधळ पुन्हा एकदा निदर्शनास आला.