Central Railway Mega Block: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवार, 29 जून 2025 रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुख्य मार्ग:
ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत अप आणि डाउन जलद मार्गांवर ब्लॉक राहणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.34 ते दुपारी 3.03 पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद/अर्धजलद उपनगरी सेवा ठाणे आणि कल्याण दरम्यान धिम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील व 10 मिनिटे उशिरा पोहोचतील.
कल्याण येथून सकाळी 10.28 ते दुपारी 3.40 दरम्यान सुटणाऱ्या अप जलद/अर्धजलद गाड्या देखील अप धिम्या मार्गावरून धावतील आणि त्याचप्रमाणे दिवा, मुंब्रा व कळवा येथे थांबतील. या गाड्याही 10 मिनिटे उशिराने पोहोचतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा दादर येथून सुटणाऱ्या डाउन मेल/एक्सप्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण दरम्यान 5व्या मार्गावरून वळवण्यात येतील. तसेच अप मेल/एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे/विक्रोळी दरम्यान 6व्या मार्गावरून वळवण्यात येतील.
हेही वाचा: सुधाकर बडगुजर यांनी ठाकरे गटाला दिला आणखी एक मोठा धक्का
हार्बर लाईन:
पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट लाईन वगळून) सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत अप व डाउन हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक असेल.
पनवेलहून 10.33 ते दुपारी 4.49 दरम्यान सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या हार्बर सेवा तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 9.45 ते दुपारी 4.12 दरम्यान बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
ट्रान्स-हार्बर लाईन:
पनवेलहून 11.02 ते दुपारी 4.53 दरम्यान ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर सेवा आणि ठाणेहून 10.01 ते दुपारी 4.20 दरम्यान पनवेलकडे जाणाऱ्या डाउन ट्रान्स-हार्बर सेवा रद्द राहतील.
विशेष उपाययोजना:
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस– वाशी दरम्यान विशेष लोकल गाड्या चालवण्यात येणार आहेत. ठाणे –वाशी/नेरुळ दरम्यान ट्रान्स-हार्बर सेवा व पोर्ट लाईन सेवा उपलब्ध राहणार आहेत.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ही देखभाल आवश्यक असल्याचे स्पष्ट केले असून, गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.