Chandrapur Crime News: सावकारी जिंकली, व्यवस्था हरली; कर्जाच्या ओझ्याखाली बळीराजाने किडनी विकली

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील एका शेतकऱ्याने सावकारी कर्जाच्या छळामुळे कर्ज फेडण्यासाठी किडनी विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Chandrapur Crime News: सावकारी जिंकली, व्यवस्था हरली; कर्जाच्या ओझ्याखाली बळीराजाने किडनी विकली

चंद्रपूर :एका शेतकऱ्याच्या उध्वस्त झालेल्या आयुष्याने आज माणुसकीला आणि व्यवस्थेला प्रश्न निर्माण केला आहे. चंद्रपूर मधील नागभीड तालुक्यातील मिंथुर गावात घडलेली ही घटना केवळ गुन्हा नाही, तर व्यवस्थेने शेतकऱ्याला किती एकटं पाडलं आहे याचं जिवंत उदाहरण आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका बळीराजाला जगण्यासाठी नाही, तर कर्ज फेडण्यासाठी स्वतःचे अवयव विकण्याची वेळ आली, यापेक्षा अधिक वेदनादायक सत्य काय असू शकते?

रोशन सदाशिव कुडे हे त्या शेतकऱ्याचे नाव. चार एकर शेती, मेहनतीचे हात आणि कुटुंबासाठी काहीतरी करण्याची जिद्द इतकंच त्यांचं भांडवल होतं. पण निसर्गाने साथ सोडली. पीक आलं नाही. शेतीतून उत्पन्न मिळालं नाही. मग शेतीपूरक व्यवसायाचा विचार केला. दूधधंदा सुरू करण्यासाठी दोन सावकारांकडून एक लाख रुपये घेतले. आशा होती, पण नशीब पुन्हा आडवं आलं. गाई दगावल्या. कर्ज फेडायचं मात्र तसंच राहिलं. त्यांच्या आयुष्यात इथून सुरू झाला सावकारी छळ.

हेही वाचा: Latur Crime : एक कोटीच्या 'टर्म इन्शुरन्स'साठी स्वतःच्या हत्येचा बनाव , महिलेसोबतच्या चॅटिंगने उलगडले भयानक जळीत हत्याकांडाचे रहस्य

सावकारांचे रोजचे फोन, घरी येऊन अपमान, धमक्या असे प्रकार त्यांच्या बाबतीत सुरू होते. कर्जातून सुटका व्हावी म्हणून रोशन कुडे यांनी दोन एकर जमीन विकली, ट्रॅक्टर विकला, घरातलं सामान विकलं. पण कर्ज संपलं नाही. उलट 1 लाखाचं कर्ज 74 लाखांवर गेलं. दिवसाला 10 हजार रुपये व्याज हे ऐकून अंगावर काटा येतो. प्रश्न असा आहे की, हे सगळं होत असताना कायदा, पोलीस, प्रशासन कुठे होतं?

शेवटी एक क्षण असा आला, जिथे पैसे नसल्याने फक्त शेतकरी बांधवाचं हतबल शरीर बाकी होतं. एका सावकाराने थेट किडनी विकण्याचा सल्ला दिला. एजंटमार्फत रोशन कुडे यांना कोलकत्ता आणि नंतर कंबोडिया येथे नेण्यात आलं. तपासण्या झाल्या. ऑपरेशन झालं. किडनी काढण्यात आली. बदल्यात मिळाले फक्त आठ लाख रुपये. अन्याय झाला की माणूस पोलिसांकडे जातो. रोशन कुडे गेले. पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली. पण त्यानंतर काहीच घडलं नाही. वेळेत पाऊल उचललं असतं, तर एका शेतकऱ्याची किडनी वाचली असती का? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

आज परिस्थिती अशी आहे की कर्ज अजूनही संपलेलं नाही. किडनी गेली, जमीन गेली, साधनं गेली, आता उरला आहे फक्त आक्रोश. म्हणूनच रोशन कुडे यांनी मंत्रालयासमोर कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा दिला आहे. सरकारला हा इशारा ऐकू येतोय का? शेतकऱ्याला जगण्यासाठी स्वतःचा अवयव विकावा लागतो, ही व्यवस्था कोणासाठी आहे? माणुसकी खरंच हरवली आहे का? असा सवाल या घटनेने निर्माण केला आहे.

हेही वाचा: Ashish Shelar On Uddav Thackeray : "अरे लबाड बोक्यांनो…" आशिष शेलारांनी ट्वीट करत ठाकरेंवर साधला निशाणा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number