Latur Crime : एक कोटीच्या ‘टर्म इन्शुरन्स’साठी स्वतःच्या हत्येचा बनाव , महिलेसोबतच्या चॅटिंगने उलगडले भयानक जळीत हत्याकांडाचे रहस्य

जळीत हत्याकांडाचा लातूर पोलिसांनी छडा लावला असून आरोपीला कोकणातून अटक केली आहे.

Latur Crime : एक कोटीच्या ‘टर्म इन्शुरन्स’साठी स्वतःच्या हत्येचा बनाव , महिलेसोबतच्या चॅटिंगने उलगडले भयानक जळीत हत्याकांडाचे रहस्य

लातूर : तीन वर्षांपूर्वी काढलेल्या एक कोटीच्या विम्यासाठी एका निष्पाप वृद्धाला मध्यरात्री जिवंत जाळून स्वतःच्या मृत्यूचा बनाव करणाऱ्या औसा तालुक्यातील वानवडा रोडवरील जळीत हत्याकांडाचा लातूर पोलिसांनी छडा लावला असून आरोपीला कोकणातून अटक केली आहे.

वानवडा रोडवर एका कारला आग लागल्याचा फोन दि. 14 डिसेंबर, 2025 रोजी औसा पोलिसांना आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी शोध घेतला असता कारमध्ये एक व्यक्ती जळाल्याचे समजले. तात्काळ या संदर्भात औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनात औसा पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून शोध घेतला असता आरोपी गणेश चव्हाण याने 13 डिसेंबरच्या मध्यरात्री  औसा शहरातील याकतपूर रोडवर मधधुंद अवस्थेत असलेल्या गोविंद यादव या व्यक्तीला लिफ्ट देण्याच्या कारणाने कारमध्ये बसवले आणि औसा शहरापासून वानवडा जाणाऱ्या रस्त्यावर आणुन मधधुंद अवस्थेतील गोविंदला गाडीत डांबून रोडच्या कडेला उभा असलेल्या गाडीला पेटवले.

हेही वाचा – Mohali Crime News: सिद्धू मुसेवालाचा बदला घेतला? मोहालीत राणा बलाचौरियाला संपवलं, बंबीहा गँगने स्वीकारली जबाबदारी

गाडीने पेट घेताच आरोपी गणेशने घटनास्थळावरून पळ काढत औसा टी पॉईंटला येऊन खाजगी ट्रॅव्हल्सने थेट कोल्हापूर गाठले. पोलीस तपास करताना आरोपी गणेश मयत असताना त्याच्या मोबाईल वरून एका महिलेशी त्याचे व्हाट्सअप चॅटिंग सुरू असल्याचे समोर आले. लातूर पोलिसांनी तात्काळ कोल्हापूर गाठत आरोपी गणेश चव्हाणच्या मुसक्या आवळल्या. 

हेही वाचा – Mumbai Crime: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलाने 'ती' गोळी खाल्ली अन् 5 वर्षांच्या चिमुरडीसोबत नको ते कृत्य केलं 

मागील तीन वर्षांपूर्वी आरोपी गणेश चव्हाणने फ्लॅटसाठी 57 लाख रुपयांचे कर्ज काढले होते. त्यामुळे तो मागील सहा महिन्यापासून आर्थिक विवंचनेत होता. परंतु त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांचे टर्म इन्शुरन्स मिळणार होते. ते मिळवण्यासाठी आरोपी गणेश चव्हाण हे स्वतःच्या मृत्यूचा बनाव करत एका निष्पाप व्यक्तीचा जाळून खून केला. लातूरच्या औसा तालुक्यात घडलेल्या या भयानक जळीत हत्याकांडाचा 24 तासात पर्दाफाश केल्याने लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या कार्यक्षमतेचे लातूर जिल्ह्यात कौतुक होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number