छत्रपती संभाजीनगर: पावसामुळे घरासमोर साचलेल्या डबक्यात बुडून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू झाला. सिल्लोड शहरालगतच्या मोढा शिवारातील कांबळे वस्ती येथे ही घटना घडली. रुद्र कांबळे आणि हर्षा कांबळे अशी मृत भावंडांची नावे आहेत. गणेश कांबळे यांच्या घरासमोर पावसामुळे डबके साचले होते. बराचवेळ होऊनही मुलं घरी न आल्याने त्यांनी शोध घेतला. रुद्रचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यानंतर हर्षांचाही मृतदेह आढळला.
हेही वाचा : 'सामना'च्या पहिल्या पानावर राज ठाकरेंची फोटोसह बातमी
घरासमोरील डबक्यात बुडून भावंडांचा मृत्यू
पावसामुळे घरासमोर साचलेल्या डबक्यात बुडून चिमुकल्या बहीण- भावाचा मृत्यू झाला आहे. सिल्लोड शहरालगतच्या मोढा शिवारातील कांबळे वस्ती येथील ही घटना आहे. गुरुवारी ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. रुद्र कांबळे (अडीच वर्ष) आणि हर्षा कांबळे (4 वर्ष) अशी मृत भावंडांची नावे आहेत. मोढा शिवारातील कांबळे वस्तीवरील गणेश कांबळे यांच्या घरासमोर पावसामुळे डबके साचले होते. कांबळे हे गुरुवारी दुपारी पत्नी व दोन्ही मुलांना घेऊन बाहेरगावहून घरी परतले. दोघे पती-पत्नी घरात असताना मुले खेळत खेळत घरासमोर साचलेल्या डबक्याकडे गेली. शेजारीच कांबळे यांचे वडील राहतात. त्यामुळे मुले त्यांच्याकडे गेली असावीत, असा कांबळे दांपत्याचा समज झाला. बराचवेळ होऊनही मुले घरी न आल्याने त्यांनी शोध घेतला. रुद्रचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यानंतर हर्षांचाही मृतदेह आढळला.