Chhatrapati Shivajimaharaj Jayanati 2026 : शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्साह; मुख्यमंत्र्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून शिवजन्मोस्तव साजरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पाळणा सोहळा, मर्दानी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भारावले. राज्यभरातही जयंती उत्साहात साजरी होत आहे.

Chhatrapati Shivajimaharaj Jayanati 2026 : शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्साह; मुख्यमंत्र्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून शिवजन्मोस्तव साजरा

पुणे: किल्ले शिवनेरीवर आज स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती शासकीय पद्धतीने अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. सह्याद्रीच्या साक्षीने पार पडलेल्या या सोहळ्याला लाखो शिवभक्तांनी उपस्थिती लावली होती. संपूर्ण गड परिसर फुलांच्या आकर्षक सजावटीने नटला होता, तर ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘जय जय भवानी’च्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले.

या भव्य सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेतील पराक्रमाची आठवण करून दिली. त्यांच्या कार्याची उज्ज्वल परंपरा पुढील पिढ्यांनी जपावी, असा संदेशही यावेळी देण्यात आला. उपस्थितांच्या डोळ्यासमोर शिवचरित्राचा इतिहास जणू जिवंत झाला.

हेही वाचा: MP On Rajya Sabha : ‘आता तरी निष्ठावंतांचा विचार करा’, भाजपमधील एका गटाचा मतप्रवाह; राज्यसभेसाठी ‘या’ प्रमुख नावांची चर्चा

शिवजन्मस्थळ असलेल्या या पवित्र गडावर पारंपरिक पद्धतीने पाळणा हलवून शिवजयंती साजरी करण्यात आली. उपस्थित भगिनींनी अत्यंत भावपूर्ण स्वरात पाळणा गीत सादर केले. शासकीय इतमामात मर्दानी खेळ, पराक्रमी क्रीडा प्रकार आणि पारंपरिक सादरीकरणांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. शिवनेरीच्या अंगणात इतिहास, परंपरा आणि अभिमान यांचा संगम अनुभवायला मिळाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय ठरली. त्यांनी छत्रपती शिवरायांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्याच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला. गडावर शिस्तबद्ध आयोजन करण्यात आले होते. लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीतही कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान, राज्यभरातही छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. विविध शहरांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवरायांची कीर्ती आज जगभर पोहोचली असून त्यांच्या शौर्यगाथेचे स्मरण करण्याचा हा दिवस महाराष्ट्राच्या अस्मितेचा दिमाखदार उत्सव ठरत आहे.

हेही वाचा: Gold Rate Today : सोने-चांदी स्वस्त की महाग?; जाणून घ्या, तुमच्या शहरातील आजचे दर एका क्लिकवर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number