दुर्गा विसर्जनाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण गंभीर जखमी; अमरावतीत नेमकं काय घडलं?

अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरातील एका दुर्गा मंडळाच्या विसर्जनादरम्यान ढोलताशा पथक व आयोजकांमध्ये राष्ट्रीय महामार्गावर हाणामारी झाल्याची घटना घडली.

दुर्गा विसर्जनाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण गंभीर जखमी; अमरावतीत नेमकं काय घडलं?
Amravati News

अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरातील एका दुर्गा मंडळाच्या विसर्जनादरम्यान ढोलताशा पथक व आयोजकांमध्ये राष्ट्रीय महामार्गावर हाणामारी झाल्याची घटना घडली. या हाणामारीत दुर्गा मंडळातील दोन तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे येत आहे.

हेही वाचा- इन्स्टाग्रामवरील व्हिडिओ ठरला वादाचे कारण; नववीतील विद्यार्थ्याचा विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला

हाणामारीची घटना चक्क पोलीस ठाण्यासमोरच घडल्याने शहरात कायदा संस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक पोलीस ठाण्याच्या अगदी समोरच ढोलताशा पथक आणि आयोजकांमध्ये तुफान हाणामारी उसळली.

भरचौकात सरेआम मारहाण झाल्याने खाकीच्या नाकावर टिच्चून ऐन ठाण्याच्या दारातच दोन्ही गटांनी घातलेल्या या मारहाणीमुळे तिवसा शहरात कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्याचे संतापजनक चित्र समोर आले असून जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना थेट अमरावती हलवण्यात आले.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number