5 मिनिटांत बुडाली 5 मजली बोट; 9 जणांचा मृत्यू,तर 30 जण बेपत्ता

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   कोलंबियातील मेडेलिन जवळच्या समुद्रात रविवारी पाच मजली बोटीला 5 मिनिटात जलसमाधी मिळाली आहे.   यावेळी बोटीवर जवळपास 150 पर्यटक प्रवास करत होते. यातील 9 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 30 जण अजूनही बेपत्ता आहेत.   अल-अल्मीरांते नावाचं हे बोट मेडेलिनपासून 45 किलोमीटर आत समुद्रात बुडाले. या बोटीतील 21 जण गंभीर जखमी […]

5 मिनिटांत बुडाली 5 मजली बोट; 9 जणांचा मृत्यू,तर 30 जण बेपत्ता

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

कोलंबियातील मेडेलिन जवळच्या समुद्रात रविवारी पाच मजली बोटीला 5 मिनिटात जलसमाधी मिळाली आहे.

 

यावेळी बोटीवर जवळपास 150 पर्यटक प्रवास करत होते. यातील 9 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 30 जण अजूनही बेपत्ता आहेत.

 

अल-अल्मीरांते नावाचं हे बोट मेडेलिनपासून 45 किलोमीटर आत समुद्रात बुडाले. या बोटीतील 21 जण गंभीर जखमी असून, 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

तर 30 जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांकडून बचावाचं कार्य करण्यात येत होते.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number