Latur Crime: सतत मारहाण, त्रास, 20 एकर शेती हडपली…वडिलोपार्जित संपत्तीसाठी डॉक्टर मुलगा आणि प्रोफेसर सुनेने 80 वर्षीय आईला घराबाहेर काढलं

याप्रकरणी पीडित वृद्ध माता शांताबाई दत्तात्रय क्षीरसागर यांनी लातूर येथील विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.<br/>

Latur Crime: सतत मारहाण, त्रास, 20 एकर शेती हडपली…वडिलोपार्जित संपत्तीसाठी डॉक्टर मुलगा आणि प्रोफेसर सुनेने 80 वर्षीय आईला घराबाहेर काढलं

Latur Crime: समाजात सुशिक्षित मानल्या जाणाऱ्या डॉक्टर मुलगा आणि प्राध्यापक सुनेने आपल्या 75 ते 80 वर्षांच्या वृद्ध आईला बेदम मारहाण करून घराबाहेर काढल्याची अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना लातूरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित वृद्ध माता शांताबाई दत्तात्रय क्षीरसागर यांनी लातूर येथील विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.

नेमकी घटना काय?

शांताबाई क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा डॉ. श्रीरंग दत्तात्रय क्षीरसागर (जे व्यवसायाने डॉक्टर आहेत), सून (जी एका महाविद्यालयात प्रोफेसर आहे) गेल्या 30 वर्षांपासून त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देत आहेत. मुलाने आईची तब्बल 20 एकर शेती स्वतःच्या नावावर करून घेतली आणि आता मालमत्ता हडपल्यानंतर आईलाच घरातून हाकलून दिले आहे.

हेही वाचा – Abhimanyu Singh : अभिमन्यू सिंह यांच्या घरावर दरोडा; तब्बल एक कोटी 37 लाख रुपये लंपास, पोलिसांनी आरोपीला केली अटक

मुलीने मांडली आईची व्यथा

पीडित शांताबाईंच्या मुलीने आपल्या भावाच्या आणि भावजयीच्या क्रूरतेचा पाढा वाचला. तिने सांगितले की, ‘माझ्या वडिलांनी भावजयीला स्वतःच्या मुलीप्रमाणे शिकवून तिचे शिक्षण पूर्ण केले. मात्र, आज तीच शिकलेली सून एका महाविद्यालयात प्रोफेसर असूनही आईला मारहाण करत आहे. भावाने आईच्या विरोधात दिवाणी दावा दाखल केला असून, अवघ्या एका दिवसात ‘स्टे ऑर्डर’ आणली आहे. पैशाच्या जोरावर न्याय विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.’

हेही वाचा – Crime News: धर्माच्या नावावर बँकांनाही चुना; बीडमध्ये ‘गुलजार-ए-रझा’ ट्रस्टचा कोट्यवधींचा स्कॅम उघड

पोटच्या मुलाकडून छळ

पोटच्या मुलाकडून आणि सुनेकडून होणाऱ्या या त्रासामुळे 80 वर्षांच्या या माऊलीवर ऐन वृद्धापकाळात न्यायासाठी पोलील ठाण्यात जाण्याची वेळ आली आहे. ‘मुलगा संपत्ती लुबाडतो, मारहाण करतो आणि सून-लेक त्रास देतात,’ असे सांगताना शांताबाईंना अश्रू अनावर झाले होते.

तक्रार दाखल, न्यायाची प्रतीक्षा

दरम्यान, विवेकानंद चौक पोलिसांनी याप्रकरणी तक्रार नोंदवून घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे. एका डॉक्टर मुलाने आणि सुशिक्षित सुनेने वृद्ध आईसोबत केलेले हे वर्तन समाजासाठी अत्यंत हानीकारक असल्याचे बोलले जात आहे. आता या हतबल माऊलीला न्याय मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number