Wednesday, July 09, 2025 09:42:15 PM

Coronavirus Update: राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 914 वर

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, शुक्रवारी 102 नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे रुग्णांची संख्या 1 हजार 914 वर पोहोचली आहे.

coronavirus update राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 914 वर

मुंबई: राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, शुक्रवारी 102 नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे रुग्णांची संख्या 1 हजार 914 वर पोहोचली आहे. तर मुंबईतील रुग्णांची संख्या 805 इतकी झाली आहे. राज्यामध्ये शुक्रवारी कोरोनामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 25 वर पोहोचली आहे. हे मृत्यू सातारा, कोल्हापूर, उल्हासनगर आणि मुंबईमध्ये झाले आहेत.  यातील तीन रुग्ण हृदयविकाराने त्रस्त होते. तर एका रुग्णाला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता.

राज्यामध्ये शुक्रवारी सापडलेल्या 102 रुग्णांमध्ये 27 रुग्ण मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत सापडले. त्याखालोखाल पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत 26, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, सांगली जिल्हा, सांगली महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीत प्रत्येकी पाच जण रुग्ण सापडले. मालेगाव महानगरपालिका हद्दीत 4, पनवेल महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका हद्दीत प्रत्येकी 3, नवी मुंबई महानगरपालिका, अमरावती जिल्हा, कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत प्रत्येकी 2, अकोला, नागपूर व उल्हासनगर महानगरपालिका हद्दीत प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.  

हेही वाचा : Bachchu Kadu: सोमवारपासून बच्चू कडूंचं पाणीत्याग आंदोलन

जानेवारी 2025 पासून राज्यात एकूण 20 हजार 468 कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 1 हजार 914 जण बाधित आढळले. आतापर्यंत 1276 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, 613 रुग्ण सक्रिय आहेत. सध्या असलेल्या सक्रिय रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत.


सम्बन्धित सामग्री