Sunday, July 13, 2025 10:39:15 AM

बीड अत्याचार प्रकरणावरुन दमानियांचे संदीप क्षीरसागरांवर आरोप

बीडमधील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणावर अंजली दमानिया यांनी भाष्य केले आहे. दमानिया यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आरोप केला आहे.

बीड अत्याचार प्रकरणावरुन दमानियांचे संदीप क्षीरसागरांवर आरोप

मुंबई: बीडमधील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणावर अंजली दमानिया यांनी भाष्य केले आहे. दमानिया यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आरोप केला आहे. कोचिंग क्लासच्या मालकाला क्षीरसागर मदत करायचे?, कोचिंग क्लासच्या मालकाला राजाश्रय होता? असे सवाल त्यांनी क्षीरसागर यांना केले आहेत. तसेच या प्रकरणी सीडीआर तपासणी करत कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्स पोस्ट करत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप केले आहेत. बीड शहरातील एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये एका 17 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेवर दमानिया यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. बीड जिल्ह्यात झालेल्या अत्याचारावर अतिशय धक्कादायक माहिती पुढे येत आहे. त्या कोचिंग क्लासच्या मालकाला आमदार संदीप क्षिरसागर पदोपदी मदत करायचे? त्यांचा राजाश्रय होता ह्यांना? किती किलासवाणी असे म्हणत त्यांनी आमदार क्षीरसागर यांच्यावर आरोप केले आहेत. या प्रकरणात सुद्धा सक्त कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच सगळ्या सीडीआरची तपासणी झाली पाहिजे असे सामाजिक कार्यकर्त्या दमानिया यांनी म्हटले आहे. 


हेही वाचा: संदीप क्षीरसागर आणि आरोपीचे सीडीआर तपासा; अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंगप्रकरणी मुंडेंचे आरोप

नेमकं प्रकरण काय?

खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये नीटची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ केल्याप्रकरणी दोन शिक्षकांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शिक्षकांवर गुन्हा दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बीड शहरात विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे दोन शिक्षक कोचिंग चालवतात. या दोघांकडून नीटची तयारी करणाऱ्या मुलीचा लैंगिक छळ करण्यात आला. क्लासनंतर हे दोन शिक्षक मुलीला केबिनमध्ये बोलावून तिचा लैंगिक छळ करायचे. तिला एकटीला केबिनमध्ये बोलावून किस करायचे, छातीला आणि गुप्तांगाला टच करायचे. तसेच अंगावरील कपडे काढायला लावून फोटो काढायचे असे मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार असह्य झाल्याने मुलीने तिच्या आई वडिलांना सांगितला. त्यानंतर तिच्या पालकांनी थेट पोलीस स्टेशन गाठले आणि सदर प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर खाजगी कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


सम्बन्धित सामग्री