Earthquake In Palghar : आठवड्यातील तिसरी घटना! पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Earthquake In Palghar : आठवड्यातील तिसरी घटना! पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पालघर : पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवार, ३१ जुलै रोजी दुपारी ४ वाजून 47 मिनिटांच्या सुमारास हे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 इतकी नोंदवण्यात आली आहे. साधारण डहाणू आणि तलासरी परिसरापर्यंत या भूकंपाचे हादरे जाणवल्याचे सांगितले जात आहे. अचानक जमिनीला कंप जाणवू लागल्याने नागरिक घाबरून घराबाहेर पडले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाली नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तर या आठवड्यात पालघरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची ही तिसरी घटना असल्याचे पाहायला मिळत आहे. 

हेही वाचा : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकारने 'या' योजनेला दिली 2031 पर्यंत मुदतवाढ

यापूर्वी मंगळवार, 28 जुलै रोजी सायंकाळी पहिल्यांदा भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 इतकी नोंदवण्यात आली होती. या भूकंपाचे हादरे धुंदलवाडी, आंबोली, कासा तसेच परिसरात जाणवले होते. अचानक जमिनीला कंप जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि अनेक जण घराबाहेर पडले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version