लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! पुढचा हप्ता हवा असेल तर आजच करा ‘हे’ काम; अन्यथा पैसे अडकणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! पुढचा हप्ता हवा असेल तर आजच करा ‘हे’ काम; अन्यथा पैसे अडकणार
Ladki Bahin Yojana Installment Update

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. ही योजना राज्यातील महिलांच्या आर्थिक मदतीसाठी सुरू करण्यात आलीये असून आता सप्टेंबर हप्त्याची प्रतीक्षा कायम आहे.

कारण ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरच्या शेवटी खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली होती, त्यामुळे आता सप्टेंबरचा हप्ता हा ऑक्टोबर महिन्यात मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय.

सरकारकडून लाभार्थ्यांची तपासणी आणि e-KYC प्रक्रिया सुरू आहे. या पडताळणीनंतर आता पात्र महिलांची संख्या 1.66 कोटींवर आली आहे. याआधी विविध कारणांमुळे सुमारे 66 लाख महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आली होती.

हेही वाचा – नवरात्रीच्या व्रतादरम्यान रोज काय खायचं याचा प्रश्न पडतोय? साबुदाणा खिचडीपासून राजगिऱ्याच्या थालीपीठापर्यंत जाणून घ्या सोप्या आणि पौष्टिक रेसिपीज

पुढच्या हफ्त्यासाठी या गोष्टी तपासून पाहा
1. e-KYC पूर्ण करा: जर तुम्ही e-KYC केले नसेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो.
2. आधार-बँक लिंकिंग तपासा: तुमचे बँक खाते आधारशी लिंक असणे गरजेचे आहे.
3. पात्रता निकष तपासा: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त असेल, कुटुंबात कोणी आयकर भरत असेल किंवा सरकारी नोकरीत असेल तर तुम्ही अपात्र ठरू शकता.

त्यामुळे पुढचा हप्ता वेळेत मिळवण्यासाठी आपली सर्व कागदपत्रे आणि e-KYC अपडेट ठेवा.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number