पालघरमध्ये खळबळ! भूकंपाच्या धक्क्यांनी नागरिकांचा थरकाप; इतक्या रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद

पालघरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

पालघरमध्ये खळबळ! भूकंपाच्या धक्क्यांनी नागरिकांचा थरकाप; इतक्या रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद

पालघरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू आणि दापचरी भागात आज सकाळी भूकंपाचा धक्का जाणवला.

आज गुरुवार, 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:16 वाजताच्या सुमारास हा भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.7  इतकी मोजली गेली असून, तलासरीतील कुर्झे येथे त्याचा केंद्रबिंदू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – ऑक्टोबरची उष्णता करतेय हैराण? स्वतःला उष्णतेपासून वाचवण्यासाठी या टिप्स लक्षात ठेवा

डहाणू तालुक्यातील या भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तसेच या धक्क्यांमुळे स्थानिकांमध्ये भीती वाढली आहे.

सुदैवाने या भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप नाही. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून अधिकृत यंत्रणांकडून अधिक माहिती घेतली जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि भूकंपाचे धक्के जाणवल्यास सुरक्षित ठिकाणी जावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number