जयंत पाटील यांची ईडी चौकशी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सोमवारी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून चौकशी होत आहे. पाटील यांनी चौकशीपूर्वी राष्ट्रवादीच्या बलार्ड पियर इथल्या कार्यालयात कार्यकर्त्यांची भेट घेतली. ईडीला पूर्ण सहकार्य करणार असं जयंत पाटील यांनी म्हंटल आहे. तर, ईडी कारवाई विरुद्ध राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सोमवारी (दि. २२ मे) आयएलएफएस प्रकरणी […]

जयंत पाटील यांची ईडी चौकशी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सोमवारी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून चौकशी होत आहे. पाटील यांनी चौकशीपूर्वी राष्ट्रवादीच्या बलार्ड पियर इथल्या कार्यालयात कार्यकर्त्यांची भेट घेतली. ईडीला पूर्ण सहकार्य करणार असं जयंत पाटील यांनी म्हंटल आहे. तर, ईडी कारवाई विरुद्ध राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सोमवारी (दि. २२ मे) आयएलएफएस प्रकरणी ईडी कार्यालयात सकाळी ११ वाजता चौकशी झाली. जयंत पाटील यांना पाठींबा दर्शवण्यासाठी सध्या ठिकठिकाणी फलक उभारण्यात आले आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्ते आक्रमक झाले असून, ईडी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन सुरु आहे. राज्यभरातील कार्यकर्ते मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

आयएलएफएस कंपनीच्या व्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू होती कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. याआधीही या कंपनी प्रकरणी राज ठाकरे यांनाही नोटीस पाठवली होती. आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. मनी लाँडिंग झाल्याच्या संशयावरुन पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता. या प्रकरणी अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश होता कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली होती. त्याचा काही संदर्भ या नोटीसी मागे आहे का अशी चर्चा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात सुरू आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number