पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांची काल न्यायालयात सुनावणी होती. मात्र या सुनावणीला ते हजर राहू शकले नसल्याने, न्यायालयाने त्यांच्या विरोधात जामीन पात्र वॉरंट जारी केल्याने खळबळ उडाली होती. या संदर्भात, आपली प्रकृती ठीक नसल्याने आपण न्यायालयातील सुनावणीसाठी हजर राहू शकलो नाही, असं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे. तसेच आपली प्रकृती ठीक नसल्याने आणि हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने आपण कोणतीही प्रतिक्रिया देऊ इच्छित नसल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटल आहे.
आता या प्रकरणात पुढील सुनावणी 13 फेब्रुवारीला होणार आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात ईडीकडून एक हजार पानांच आरोपपत्र दाखल झाल आहे. खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही समावेश आहे. या सर्वांवर मनी लॉड्रींगचा आरोप लावण्यात आला आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज नुकताच फेटाळण्यात आला होता. त्याप्रकरणी कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.