Eknath Shinde Farmers Assurance: “कुठल्याही तालुक्याला वाऱ्यावर सोडणार नाही” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शेतकऱ्यांना आश्वासन

Eknath Shinde Farmers Assurance
Maharashtra Drought Eknath Shinde Farmers Assurance

राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती आणि बळीराजाचे अतोनात हाल पाहता अखेर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील एकूण 358 तालुक्यांपैकी 265 तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-1’ निकषाच्या आधारे अधिकृतपणे कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. या निर्णयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष पिकांचे पंचनामे पूर्ण होण्यापूर्वीच सरकारने ही घोषणा केली आहे. यामुळे राज्यातील जवळपास 75 टक्के भागात तातडीने प्रशासकीय आणि आर्थिक मदत पोहोचवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यासंदर्भात जय महाराष्ट्र वाहिनीशी दूरध्वनीवरून बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “कुठल्याही तालुक्याला वाऱ्यावर सोडणार नाही.” 265 तालुके जाहीर झाले असून आता पुढे पंचनामे, पाहणी आणि प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली जाणार आहे. आवश्यकता भासल्यास आणि पंचनाम्यानंतर गरज पडल्यास आणखी काही तालुक्यांना दुष्काळ यादीत समाविष्ट केले जाईल, अशी हमीही त्यांनी दिली.एकंदरीत, 75% महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Crop Insurance Compensation: दुष्काळ जाहीर झाल्यावर पीक विमा किती मिळणार? शेतकऱ्यांनी काय करावे?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version