Crop Insurance Compensation: दुष्काळ जाहीर झाल्यावर पीक विमा किती मिळणार? शेतकऱ्यांनी काय करावे?

महाराष्ट्रात यंदा अनेक भागात पावसाने दडी मारल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके करपून गेल्याने शेतकऱ्यांनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी लावून धरली होती, अनेक ठिकाणी आंदोलनेही झाली. अखेर राज्य सरकारने राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळ जाहीर होताच पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा लागली आहे. पण दुष्काळ जाहीर झाला म्हणजे लगेच विम्याचे पैसे खात्यात येतील, असा गैरसमज अनेकांना होतो. विम्याची रक्कम ठरवण्याची एक संपूर्ण प्रक्रिया असते.

Crop Insurance Compensation: दुष्काळ जाहीर झाल्यावर पीक विमा किती मिळणार? शेतकऱ्यांनी काय करावे?
Crop Insurance Compensation

महाराष्ट्रात यंदा अनेक भागात पावसाने दडी मारल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके करपून गेल्याने शेतकऱ्यांनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी लावून धरली होती, अनेक ठिकाणी आंदोलनेही झाली. अखेर राज्य सरकारने राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळ जाहीर होताच पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा लागली आहे. पण दुष्काळ जाहीर झाला म्हणजे लगेच विम्याचे पैसे खात्यात येतील, असा गैरसमज अनेकांना होतो. विम्याची रक्कम ठरवण्याची एक संपूर्ण प्रक्रिया असते.

पीक कापणी प्रयोग (CCE) म्हणजे काय?
पीक विम्याची रक्कम ठरवण्यासाठी CCE हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. कृषी विभागाचे अधिकारी आणि विमा कंपनीचे प्रतिनिधी मिळून शेतात जाऊन ठराविक क्षेत्रातील पीक कापून प्रत्यक्ष उत्पादन किती झाले याची नोंद घेतात. याच आकडेवारीवर तुमचा क्लेम ठरतो.

उंबरठा उत्पादन काय असते?
2026 च्या सुधारित पीक विमा योजनेनुसार, उंबरठा उत्पादन हे मागील 7 वर्षांतील सर्वोत्तम 5 वर्षांच्या सरासरी उत्पादनावरून ठरवले जाते. यंदा सर्व पिकांसाठी 70% जोखीम स्तर निश्चित करण्यात आला आहे.

Talukas Drought List Maharashtra: तुमचा तालुका दुष्काळग्रस्त यादीत आहे का? 6 विभागांतील ‘या’ 265 तालुक्यांची अधिकृत यादी जाहीर

तर विमा किती मिळू शकतो? एक उदाहरण
समजा एखाद्या पिकाचे उंबरठा उत्पादन 7 क्विंटल आहे आणि प्रत्यक्षात 5 क्विंटलच उत्पादन झाले. म्हणजे 2 क्विंटलची घट. जर त्या पिकाचे विमा संरक्षण 62,000 रुपये प्रति हेक्टर असेल, तर या 28% घटीनुसार तुम्हाला अंदाजे 17 ते 18 हजार रुपये प्रति हेक्टर विमा मिळू शकतो.

हा फक्त एक अंदाज आहे. प्रत्यक्ष रक्कम तुमचे पीक, उंबरठा उत्पादन, विमा संरक्षण आणि त्या हंगामाचे नियम यावर अवलंबून असेल.

शेतकऱ्यांनी काय करावे?
1. नुकसानीची माहिती 72 तासांच्या आत द्या.
2. तुम्ही तुमच्या विमा कंपनीला, कृषी विभागाला किंवा बँकेला कळवू शकता.
3. PMFBY Crop Insurance App वरून किंवा pmfby.gov.in वर जाऊन तुम्ही क्लेम आणि अर्जाचा स्टेटस चेक करू शकता.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number