राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्या आहेत. याचपार्श्वभूमिवर 13 जानेवारीला असं असताना सायंकाळी 5:30 वाजता जाहीर प्रचाराची मुदत संपत आहे. त्यामुळे टीव्ही, वर्तमानपत्रे किंवा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर निवडणूकविषयक जाहिराती दाखवण्यावर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मात्र, प्रचार संपण्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचे पत्रक काढून सर्व राजकीय पक्षांना सतर्क केले आहे.
हेही वाचा- ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत अजित पवारांवर संकट, राजकीय सल्लागाराच्या कार्यालयावर गुन्हे शाखेची कारवाई, अजित पवार म्हणाले, 'पक्ष त्यांच्या पाठीशी...'
मुदत संपल्यानंतर रस्त्यावरचा प्रचार संपला आहे, मात्र घरोघरी प्रचार करता येणार आहे. मुदत संपल्यानंतरही घरोघरी प्रचाराला अनुमती देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाने सर्वजन चकित झाले आहेत. यावेळी निवडणूक आयोगाने म्हटलं की, प्रचारासाठी जी मुदत आहे ती 48 तासाच्या आधी प्रचार समाप्त होतो. 15 तारखेला निवडणूक आहे, त्याच्यामुळे 13 तारखेला 5.30 नंतर हा प्रचार करता येणार नाही. 5.30 नंतरची जी मुदत आहे ती जाहीर प्रचारासाठी आहे, 5.30 नंतर जाहीर प्रचार करता येणार नाही.
Devendra Fadnavis : 'कितीही टिंगल-टवाळी केली....टोमणे मारले, तरी लोकं कामं लक्षात ठेवतात'; देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना सणसणीत उत्तर
यावेळी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी 2012 च्या एका आदेशाचा दाखला देत तो आदेशच वाचून दाखवला. दरम्यान यावेळी राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा केली. सध्या सर्वत्र मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजत आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होईल तसेच 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होणार आहे.