Crime : मुलीच्या प्रेमविवाहाचा राग अनावर; गावकऱ्यांनी कुटुंबासोबतच…; अहिल्यानगरमधील संतापजनक प्रकार

एका फतव्याने उध्वस्त झाले अख्खे कुटुंब
प्रेमविवाहाचा राग कुटुंबावर काढला

मुलीने जातीमध्येच प्रेमविवाह केल्याने चक्क संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगरमधील धामोरी येथे घडला आहे. नंदीवाले तिरमली जातपंचायतीने पीडित कुटुंबाकडून 50 हजार रुपयांचा दंड बसूल करुन त्यांच्यावर सामाजित बहिष्कार देखील टाकला आहे. भाऊसाहेब आनंदा अहिरे यांच्या सज्ञान मुलीने जातीमधीलच तरुणाशी प्रेमविवाह केला होता. हे केलेले लग्न नियमाविरुद्ध असल्याचे सांगत पंचायतीने अहिरे कुटुंबाला एक लाखांचा दंड ठोठावला.

हेही वाचा -Ratnagiri Ganpati Visarjan Accident : गणपती विसर्जनासाठी नदीत उतरला, पण परतलाच नाही! रत्नागिरीत तरुणाचा बुडून मृत्यू; बचावासाठी आजोबांची धडपड Video Viral

सुया-फण्या विकून राहणाऱ्या या गरीब अहिरे कुटुंबाने कर्ज काढून 50 हजार रुपये दिले. तर उरलेली रक्कम ही न दिल्याने पंचायतीने संबंधित कुटुंबाला मारहाण करत वाळीत टाकले. या कुटुंबाशी कोणी बोलायचे नाही, सुख-दु:खात सहभागी करायचे नाही, जो त्यांच्याशी बोलेल त्यालाही जातीबाहेर काढू, असा अजब फतवा काढण्यात आला. मुलीला माहेरी जाण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी बंदी घातली आहे. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमातही त्यांना प्रवेश नाकारला. मात्र, आता प्रकरणी सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version