छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA ची धडक कारवाई; तब्बल 1.29 लाखांची 431 किलो खोबरे पावडर जप्त

नवीन मोंढा परिसरातील मे. बॉम्बे ड्राय फ्रूट्स अँड मसाला या प्रतिष्ठानावर छापा टाकून 1 लाख 29 हजार 300 रुपये किमतीची 431 किलो खोबरे पावडर जप्त करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA ची धडक कारवाई; तब्बल 1.29 लाखांची 431 किलो खोबरे पावडर जप्त
fda raid

छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या काळात अन्न भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई तीव्र केली आहे. जाधववाडीतील नवीन मोंढा परिसरातील मे. बॉम्बे ड्राय फ्रूट्स अँड मसाला या प्रतिष्ठानावर छापा टाकून 1 लाख 29 हजार 300 रुपये किमतीची 431 किलो खोबरे पावडर जप्त करण्यात आली. संबंधित प्रतिष्ठानाचा अन्न परवानाही तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. 24 ऑक्टोबर रोजी झालेल्या या कारवाईत ‘शिखर’ ब्रँडची एक किलो वजनाची 431 पॅकेट्स जप्त करण्यात आली. या उत्पादनांमध्ये भेसळ आणि वेष्टनावरील नियमांचे उल्लंघन असल्याचा प्राथमिक संशय आहे. जप्त साठा सील करून सुरक्षित ताब्यात ठेवण्यात आला असून, नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी फरीद सिद्दिकी आणि प्रशांत अजिंठेकर यांच्या पथकाने सहआयुक्त एस. आर. करकळे व सहाय्यक आयुक्त डी. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

हेही वाचा : दुर्गा विसर्जनाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण गंभीर जखमी; अमरावतीत नेमकं काय घडलं?

ऐन सणासुदीत खाद्यतेलाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह!

दिवाळीच्या सणासुदीत खाद्यतेलाची मागणी वाढलेली असतानाच, अन्न व औषध प्रशासनाने पंढरपूर परिसरातील खाद्यतेल रिपॅकिंग युनिटवर मोठी कारवाई केली आहे. तब्बल 14 लाख 8 हजार रुपयांचे 6 हजार 280 लिटर खाद्यतेल जप्त करण्यात आले असून, संबंधित युनिटचा अन्न परवानाही निलंबित करण्यात आला आहे. तपासणीदरम्यान अस्वच्छता आणि इतर गंभीर त्रुटी आढळल्याने प्रशासनाने ही कारवाई केली. जप्त तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र, ऐन सणासुदीत खाद्यतेलाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाल्याने ग्राहकांच्या आरोग्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आता प्रयोगशाळेच्या अहवालातून नेमकं काय समोर येतं, याकडे लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number