Sunday, July 13, 2025 11:07:20 PM

पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पूजा खेडकर विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे, पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ 
pooja khedkar

१९ जुलै, २०२४ पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पूजा खेडकर विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे, पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ झाली आहे. 
केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२२ ची उमेदवार पूजा खेडकर हिच्या गैरवर्तनाचा तपशीलवार आणि सखोल तपास केला आहे. तिने परीक्षा नियमांच्या मर्यादा ओलांडत तिचे नाव, तिच्या वडिलांचे आणि आईचे नाव, तिचे फोटो/स्वाक्षरी, तिचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून तिची संपूर्ण ओळख खोटी दाखवलेली आहे, असे तपासातून उघड झाले आहे. त्यामुळे, केंद्रीय लोकसेवा आयोगाने पोलिस अधिकाऱ्यांकडे एफआयआर दाखल केला आहे. तिच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल करून तिच्यावर कारवाई सुरू केली आहे.  तसेच, तिची उमेदवारीही रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नागरी सेवा परीक्षेच्या नियमानुसांर, पूजा खेडकर हिने भविष्यात लोकसेवेची परीक्षा देणे अथवा तिची यात निवड होणे यावरही केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून बंदी घालण्यात आली आहे. 

        

सम्बन्धित सामग्री