लोणावळा : लोणावळ्यात घरात रायफल साफ करत असताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अभय मराठे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, घरातील रायफल साफ करत असताना अचानक गोळी सुटली आणि ती त्यांच्या छातीला लागली. गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रायफलमध्ये गोळी नेमकी कशी लोड होती आणि साफसफाईदरम्यान गोळी कोणत्या परिस्थितीत सुटली, याचा पोलीस तपास सुरू आहे. या घटनेची आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा : बुलढाण्यात रक्तरंजित थरार! शिंदेसेनेत आणि अजित पवार गटात तुंबळ हाणामारी; दोघांचा मृत्यू
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.