Saturday, February 14, 2026 04:12:01 AM

Chhatrapati Sambhajinagar : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांचा आज भाजप प्रवेश

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणचे ठाकरे गटाचे नेते तथा मागील विधानसभेला उमेदवार राहिलेले दत्ता गोर्डे आज सोमवार रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

chhatrapati sambhajinagar  उद्धव ठाकरेंना मोठा धक्का पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांचा आज भाजप प्रवेश

विजय चिडे, प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणचे ठाकरे गटाचे नेते तथा मागील विधानसभेला उमेदवार राहिलेले दत्ता गोर्डे आज, सोमवार रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे अगोदरच गळती लागलेल्या शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडले आहे. दत्ता गोर्डे हे शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख आहेत. दत्ता गोर्डे यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. परंतु त्यांना परभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये दत्ता गोर्डे यांच्या पत्नी यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचाही पराभव झाला.

दत्ता गोर्डे हे सातत्याने शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांच्याशी लढत देत आहेत. गोर्डे यांनी भुमरे यांच्याशी मोठी झुंज दिली. मात्र पक्षाकडून आवश्यक पाठबळ न मिळाल्याने गोर्डे हतबल झाल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर आता दत्ता गोर्डे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दत्ता गोर्डे हे भाजपचे मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय राज्य मंत्री भागवत कराड, माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गोर्डे भविष्यात पैठण विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमदेवार असतील असे दिसते. दरम्यान, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या काळातदेखील भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झाले. त्यावेळी देखील शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. दरम्यान, आता महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर देखील शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा : Mumbai Crime : अंधेरीत सोसायटीवर अंदाधुंद गोळीबार; आरोपी फरार, पोलिसांत गुन्हा दाखल

भुमरे यांना सातत्याने आव्हान

पैठणमध्ये भाजपला नगरपरिषद आणि इतर निवडणुकीत सातत्याने अपयश मिळत असल्याने दत्ता गोर्डे यांच्या रूपाने भुमरे यांना टक्कर देऊन पैठणमध्ये भाजपला संजिवनी देणारा नेता म्हणून दत्ता गोर्डे यांच्याकडे पाहिले जात आहे. ठाकरे सेनेत असताना गोर्डे यांना सत्तेची मदत मिळणे कठीण होते. वैजापूरमध्ये डॉ. दिनेश परदेशी यांनी भाजपमध्ये घरवापसी करताच पक्षाने बळ दिल्याने त्यांनी नगरपरिषदेत विजय मिळवत शिंदे गटाच्या आमदाराला पराभवाची चव चाखवली. गोर्डे यांना येणाऱ्या काळात भाजपकडून असेच बळ मिळण्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या