Pune PMP Bus: रूट मार्गदर्शनापासून पास व्यवस्थापनापर्यंत; पीएमपी ॲपमुळे पुणेकरांना कोणत्या नव्या सुविधा मिळाल्या?

गेल्या वर्षभरात या प्लॅटफॉर्मवरून तब्बल 4 कोटी प्रवाशांनी तिकिटे खरेदी केली आहेत. या डिजिटल क्रांतीमुळे पीएमपीएलच्या तिजोरीत 86.80 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

Pune PMP Bus: रूट मार्गदर्शनापासून पास व्यवस्थापनापर्यंत; पीएमपी ॲपमुळे पुणेकरांना कोणत्या नव्या सुविधा मिळाल्या?

Pune Public Transport: पुणेकरांची जीवनवाहिनी असलेल्या पीएमपीएलने तंत्रज्ञानाची कास धरल्याचा मोठा फायदा प्रशासनाला होताना दिसत आहे. 'आपली पीएमपी' या मोबाइल ॲपला प्रवाशांनी उदंड प्रतिसाद दिला असून, गेल्या वर्षभरात या प्लॅटफॉर्मवरून तब्बल 4 कोटी प्रवाशांनी तिकिटे खरेदी केली आहेत. या डिजिटल क्रांतीमुळे पीएमपीएलच्या तिजोरीत 86.80 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

प्रवाशांच्या पसंतीची प्रमुख कारणे

ऑगस्ट 2024 मध्ये सुरू झालेल्या या ॲपचा आलेख सुरुवातीला संथ होता, मात्र सुलभ सुविधांमुळे अल्पावधीतच 25 लाख पुणेकरांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. प्रवाशांचा कल डिजिटलकडे वाढण्यामागे खालील सुविधा महत्त्वाच्या ठरल्या आहेत:

रिअल-टाइम ट्रॅकिंग: आपली बस नेमकी कुठे आहे आणि थांब्यावर किती वेळात येईल, याची अचूक माहिती मिळते.
सुट्या पैशांच्या कटकटीतून मुक्ती: कंडक्टरकडे सुट्या पैशांसाठी होणारी वादावादी आता पूर्णपणे थांबली आहे.
वेळेची बचत: बस पास किंवा तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याची गरज उरलेली नाही.
रूट प्लॅनिंग: नवीन मार्गांची आणि बस क्रमांकांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.

डिजिटल कमाईचा नवा उच्चांक

दरम्यान, 2025 या वर्षात पीएमपीच्या डिजिटल प्रवासाने एक नवा टप्पा गाठला आहे. वर्षभराच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, तब्बल 4 कोटी 7 लाख 30 हजार प्रवाशांनी 'आपली पीएमपी' ॲपचा वापर करून तिकिटे काढली आहेत. या प्रचंड प्रतिसादामुळे पीएमपीच्या तिजोरीत एकूण 86 कोटी 80 लाख 76 हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न जमा झाले आहे. विशेषतः जुलै 2025 हा महिना उत्पन्नाच्या दृष्टीने सर्वाधिक फायद्याचा ठरला असून, केवळ या एका महिन्यात 9 कोटी 40 लाख 55 हजार रुपयांची विक्रमी कमाई झाली आहे. सध्याच्या घडीला या ॲपच्या माध्यमातून पीएमपीला दररोज सरासरी 25 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असून, पुणेकर प्रवाशांचा ओढा आता पूर्णपणे डिजिटल व्यवहारांकडे असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

हेही वाचा – Pune Accident News: पुण्यात पुन्हा हिट अँड रनचा कहर! मॉर्निंग वॉकला निघालेल्या 65 वर्षीय महिलेचा भरधाव कारच्या धडकेत जागीच मृत्यू, चालक फरार

आयफोन वापरकर्ते आणि डेली बुकिंग

ॲप वापरकर्त्यांमध्ये आयफोन (iOS) वापरणाऱ्या पुणेकरांची संख्याही 2 लाखांच्या पार गेली आहे. दररोज सरासरी 1 लाख प्रवासी मोबाइलवरून तिकीट काढत असून, 20 ते 25 हजार नागरिक डिजिटल पास सुविधेचा लाभ घेत आहेत.

सुट्ट्यांच्या काळात 'डिजिटल' प्रतिसाद वाढला

विशेष म्हणजे, उन्हाळी सुट्ट्या आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला (जून-जुलै) ॲपच्या वापरात प्रचंड वाढ झाली. जुलै 2025 हा महिना पीएमपीसाठी 'विक्रमी' ठरला, ज्यामध्ये 38 लाखांहून अधिक प्रवाशांनी डिजिटल तिकीट काढले. यामुळे केवळ प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला नाही, तर पीएमपीच्या रोख रकमेच्या व्यवस्थापनाचा ताणही कमी झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number