Gokul Election Date: गोकुळ दूध संघ निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर; कोल्हापुरात नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय आणि आर्थिक नाड्या ज्या संस्थेच्या हाती असतात, त्या प्रतिष्ठेच्या 'गोकुळ' दूध संघाच्या (Gokul Milk Union) निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे.

Gokul Election Date: गोकुळ दूध संघ निवडणुकीचं  वेळापत्रक जाहीर; कोल्हापुरात नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू

Gokul Election Date: कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय आणि आर्थिक नाड्या ज्या संस्थेच्या हाती असतात, त्या प्रतिष्ठेच्या 'गोकुळ' दूध संघाच्या (Gokul Milk Union) निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. निवडणूक प्राधिकरणाने कार्यक्रमाची घोषणा केली असून, येत्या 2 जूनपासून ठराव संकलनाच्या प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात होणार आहे. 1 जुलै 2026 ही ठराव दाखल करण्याची अंतिम मुदत ठरवण्यात आली आहे. या घोषणेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे.

रखडलेली निवडणूक अखेर मार्गी
गेल्या अनेक महिन्यांपासून न्यायालयीन वाद आणि मतदार याद्यांमधील हरकतींमुळे 'गोकुळ'ची निवडणूक प्रक्रिया अधांतरी लटकली होती. मात्र, आता हे सर्व अडथळे दूर झाले असून निवडणुकीचे वेळापत्रक समोर आले आहे. विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्याने आता नव्या सत्तेसाठी जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी आणि राजकीय गटांनी कंबर कसली आहे.

हेही वाचा – Vijay Wadettiwar VS BJP : 'भाजपाचे 100हून अधिक नगरसेवक आमच्या संपर्कात' वडेट्टीवारांचा मोठा दावा; राजकीय घडामोडींनाही वेग

मोर्चेबांधणी आणि गाठीभेटींना वेग
ठराव दाखल करण्यासाठी महिनाभराचा कालावधी मिळाल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही आघाड्यांमध्ये जोरदार रणनीती आखली जात आहे. जिल्ह्यातील प्राथमिक दूध संस्थांचे ठराव आपल्याच बाजूने करून घेण्यासाठी दोन्ही गटांकडून चाचपणी सुरू झाली आहे. नेत्यांनी संस्थाचालकांच्या भेटीगाठी घेण्यास आणि गावोगावी दौरे करण्यास सुरुवात केली आहे. 'गोकुळ'वर कोणाची सत्ता येणार? मल्टिस्टेटचा मुद्दा आणि दूध दराचे राजकारण या निवडणुकीत कसे गाजणार? याकडे आता संपूर्ण सहकार क्षेत्राचे आणि कोल्हापूरकरांचे लक्ष लागले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number