Monday, March 09, 2026 02:33:31 AM

Gold-Silver Rate: सोन्याने तोडले सर्व अंदाज, चांदीही धावली पुढे; आजचा 10 ग्रॅम दर पाहून ग्राहक चक्रावले

आज भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे, तरीही दर ऐतिहासिक उच्चांकाच्या आसपासच आहेत. 13 फेब्रुवारी 2026 रोजी भारतातील सोन्याचे भाव काय आहेत.

gold-silver rate सोन्याने तोडले सर्व अंदाज चांदीही धावली पुढे आजचा 10 ग्रॅम दर पाहून ग्राहक चक्रावले

आज भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे, तरीही दर ऐतिहासिक उच्चांकाच्या आसपासच आहेत. 13 फेब्रुवारी 2026 रोजी भारतातील सोन्याचे भाव अस्थिर असून, 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमवर सुमारे 1,55,000 ते 1,60,000 च्या दरम्यान आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,45,000 ते 1,47,000 प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला आहे. सोन्याच्या भावात वाढ झाली असून, जागतिक आणि स्थानिक घटकांमुळे हे दर उच्च पातळीवर पोहोचले आहेत.

हेही वाचा- Petrol Disel Price: धक्कादायक; 'या' कारणांमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत 80 टक्के वाढीची शक्यता; भारतासाठी धोक्याची घंटा

तसेच चांदीचे दर प्रति किलो सुमारे 2,95,000 च्या आसपास आहेत. तसेच आज मुंबईत चांदीचा भाव प्रति किलो 2,95,100 च्या आसपास आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे आणि देशांतर्गत सराफा बाजारातही आज सोन्याच्या किमतीत वाढ दिसून आली आहे. सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. भारतीय बाजारात सोन्याच्या घरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज सोन्याचे दर जाणून घ्या...

हेही वाचा- ADAS Technology Mandatory: अपघातांना ब्रेक; 2027 पासून वाहनांमध्ये ADAS तंत्रज्ञान अनिवार्य; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

जाणून घ्या शहरानुसार सोन्याचे दर कसे आहेत? 
13 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर असून मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 139,608 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 152,300 प्रति 10 ग्रॅम आहे. तसेच पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 139,608 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 152,300 रुपये आहे. नागपूरमध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 139,608 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 152,300 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 139,608 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 152,300 रुपये आहे. जागतिक बाजारातील घडामोडी आणि भारतीय रुपयाच्या मूल्यातील बदलांमुळे चांदीच्या भावात चढ-उतार होत आहेत.


सम्बन्धित सामग्री