ST Employees Diwali Bonus: दिवाळीच्या तोंडावर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी 6 हजार रुपयांचा दिवाळी बोनस आणि 12 हजार रुपयांची उचल जाहीर केली आहे. दरम्यान, दिवाळीच्या आधी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. आझाद मैदानावर समितीचे धरणे आंदोलन सुरू झाले होते. मात्र, बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्यामुळे मंगळवारपासून ठरलेले आंदोलन मागे घेतले जाणार आहे, असे कृती समितीने स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा - Sanjay Raut Hospitalised: संजय राऊतांची प्रकृती अचानक बिघडली; भांडुप येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल
एसटी कर्मचारी संघटनेच्या मागण्यांमध्ये 2018 पासून महागाई भत्ता देण्यात आलेला नाही, 2020 ते 2024 मधील वेतनवाढीतील फरक प्रलंबित आहे. तसेच अन्य थकीत रक्कमेसह एकूण 4,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही. यावर उपाय म्हणून सरकारने काही रक्कम भरण्याची तयारी दाखवली आहे.
हेही वाचा - Manchar Leopard Attack: बिबट्याने ऊसातून झडप घातली अन्..., आजोबांनी सांगितला धक्कादायक प्रकार
याशिवाय, राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिवाळीच्या आधी ‘आवडेल तिथे प्रवास’ पासमध्ये 20 ते 25 टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत प्रवाशांना एका पासवर राज्यातील कुठेही अमर्याद प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध होईल, ज्यामुळे तिकीट काढण्याची गरज कमी होईल. तथापी, सरकारचा हा निर्णय काही एसटी कर्मचाऱ्यांना समाधानकार वाटत असून काहींनी यापेक्षा जास्त दिवाळी बोनसची अपेक्षा होती. तरीही, दिवाळीच्या सणाच्या आधी हा बोनस आणि उचल मिळाल्याने कर्मचाऱ्यांची परिस्थिती थोडी सुलभ झाली आहे. तथापी, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची शक्यता टळली आहे. एकंदरीतचं दिवाळी बोनस मिळाल्याने यंदा एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.