Women’s Day 2026: पुण्यातील महिलांसाठी खुशखबर! महिला दिनानिमित्त ‘या’ 31 मार्गांवर PMPML बसने करता येणार मोफत प्रवास

येत्या 8 मार्च रोजी पुण्यातील 31 प्रमुख मार्गांवर धावणाऱ्या महिला विशेष बसमधून महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे.

Women’s Day 2026: पुण्यातील महिलांसाठी खुशखबर! महिला दिनानिमित्त ‘या’ 31 मार्गांवर PMPML बसने करता येणार मोफत प्रवास

Women's Day 2026: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) शहरातील महिला प्रवाशांना खास भेट दिली आहे. येत्या 8 मार्च रोजी पुण्यातील 31 प्रमुख मार्गांवर धावणाऱ्या महिला विशेष बसमधून महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे. याचसोबत, पुणे मेट्रोने देखील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुखावह प्रवासासाठी डब्यांमध्ये विशेष आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

PMPML चा 'मोफत प्रवास' उपक्रम
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि PMRDA क्षेत्रात महिलांच्या सुरक्षिततेसाठी 'महिला विशेष' बस चालवल्या जातात. महिला दिनानिमित्त या सेवेचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
मोफत सेवा: केवळ महिला विशेष (Ladies Special) बसमध्येच हा लाभ मिळेल.
विस्तार: सध्या 33 बसच्या माध्यमातून दिवसाला 76 फेऱ्या पूर्ण केल्या जातात.
प्रमुख मार्ग: स्वारगेट, कात्रज, हडपसर, निगडी, भोसरी, कोथरूड आणि वाघोली यांसारख्या महत्त्वाच्या भागांना जोडणाऱ्या 31 मार्गांवर ही सुविधा उपलब्ध असेल.

हेही वाचा – Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासासाठी तिसरा पर्याय; नवीन द्रुतगती मार्गाचे काम महिन्याभरात सुरू होणार, 'असा' असेल नवा मार्ग

पुणे मेट्रोमध्ये आता हक्काची जागा
महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना गर्दीच्या वेळी प्रवास करताना त्रास होऊ नये म्हणून 'महामेट्रो'ने आसनव्यवस्थेत मोठा बदल केला आहे. प्रत्येक मेट्रो ट्रेनमध्ये महिलांसाठी एकूण 46 जागा राखीव असतील. वृद्धांसाठी प्रत्येक ट्रेनमध्ये 8 जागा राखून ठेवल्या जातील. पहिल्या डब्यात 14, मधल्या डब्यात 18 आणि शेवटच्या डब्यात 14 जागा महिलांसाठी आरक्षित राहतील. या जागांवर विशेष चिन्हे (Symbols) लावली जाणार असून, मेट्रो अ‍ॅपवरही याचा आराखडा पाहता येईल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number