Gopichand Padalkar : ‘Nashik TCS निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करावे’; आमदार पडळकर यांची मागणी

निदा खान प्रकरणी तिचे समर्थन करणारे इम्तियाज जलील आणि एमआयएमच्या नगरसेवकांची चौकशी करून त्यांनाही या गुन्ह्यात सहआरोपी करावे, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

Gopichand Padalkar : ‘Nashik TCS निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करावे’; आमदार पडळकर यांची मागणी

Gopichand Padalkar on Imtiaz Jaleel in Nida Khan Case : निदा खान प्रकरणी तिचे समर्थन करणारे इम्तियाज जलील आणि एमआयएमच्या नगरसेवकांची चौकशी करून त्यांनाही या गुन्ह्यात सहआरोपी करावे, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी नाशिक पोलिसांकडे केली आहे. ‘महाराष्ट्रामध्ये लव्ह जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद, ज्यूस जिहाद आणि मागील काही दिवसांमध्ये नाशिकमध्ये सापडलेला कॉर्पोरेट जिहाद अशा वेगवेगळ्या मार्गांनी सातत्याने जिहादी प्रवृत्ती डोकं वर काढू लागल्या आहेत,’ असा घणाघात पडळकर यांनी केला. तसेच, या बाबतीत आतापर्यंत केलेल्या कारवाईसाठी नाशिक पोलिसांचं कौतुकही त्यांनी केलं आहे.

‘हीच या लोकांची प्रवृत्ती’
गोपीनाथ पडळकर यांनी एमआयएम आणि इम्तियाज जलील यांच्यासह त्यांच्या नगरसेवकांवर सडकून टीका केली. हे सर्व लोक एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला वाचवण्यासाठी सर्व काही करत असल्याचे ते म्हणाले. हीच या लोकांची प्रवृत्ती आहे, असे पडळकर म्हणाले.

हेही वाचा – Sanjay Shirsat: ‘इम्तियाज जलील यांनाही अटक करा…’; कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी संजय शिरसाटांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पोलिसांच्या अटकेत असलेली नाशिक टीसीएस प्रकरणातील प्रमुख आरोपी निदा खानसह एमआयएमच्या इम्तियाज जलील यांची चौकशी करून त्यांनाही सहआरोपी करावे, अशी मागणी पडळकर यांनी केली आहे. निदा खान आतापर्यंत फरार होती. मागील काही दिवसांपासून  इम्तियाज जलील तिचं समर्थन करत आहेत. तसेच, काही एमआयएम नगरसेवकही तिचं समर्थन करत होते. त्यातच निदा खान ही छत्रपती संभाजी नगर येथे सापडल्याने या प्रकरणात जलील आणि समर्थन करणाऱ्या नगरसेवकांचा सहभाग असू शकतो, अशी शंका आहे गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केली आहे. 

हेही वाचा – Nashik TCS Case : धक्कादायक! MIM च्या ‘या’ नगरसेवकानेच फरार निदा खानला स्वतःच्या घरात लपायला जागा दिली? 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number