Palghar Accident : पालघर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांसाठी सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येकाला मिळणार….

काल झालेल्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानिवरी येथील अपघातातील 12 मृतदेहांवर आज बापूगाव येथे एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले.

Palghar Accident : पालघर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांसाठी सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येकाला मिळणार….

काल झालेल्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानिवरी येथील अपघातातील 12 मृतदेहांवर आज बापूगाव येथे एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यासह पालघरचे स्थानिक खासदार आणि जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते. 17 जखमींवर अजूनही डहाणूच्या धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना उपचारादरम्यान कोणतीही अडचण येणार नाही यासाठी आदिवासी विकास विभाग त्यांचं पालकत्व स्वीकारत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तातडीने मदत जाहीर केल्याच उईकेंनी म्हटलं आहे.

तसंच जखमींच्या कुटुंबीयांना रुग्णालय ते गाव असं ये जा करण्यासाठी तसंच त्यांच्या राहण्याची पूर्ण व्यवस्था आदिवासी विकास विभाग करत असून आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही असं आश्वासन देखील यावेळी उईके यांनी दिल आहे. दरम्यान धानिवारी येथील अपघातातील मयतांच्या मृतदेहांवर आज बापूगाव येथे एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार पार पडले असून बापूगाव येथे मयताच्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहायला मिळाला. यावेळी अपघातात मृत पावलेल्या मृतांच्या कुटुंबियांना शासनाने पाच लाखांची जाहीर केली आहे. दरम्यान अनेक कुटुंब प्रमुख गेल्याने शासनाकडून करण्यात येणारी मदत दहा लाखांवर करावी अशी मागणी आमदार विनोद निकोले यांनी केली.

हेही वाचा- Pune Shocking Video : रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला, धारदार हत्याराने सपासप वार आणि नंतर पुलावरून खाली फेकलं; व्हिडीओ व्हायरल

पालघर मधील भीषण अपघातात मृत व्यक्तींची नावे-
सुरेश रत्ना लाखात, पांडू गणपत लाखात, काळू गोविंद लाखात, सुनील अर्जुन दांडेकर, चिमा गोविंद कुरहाडा, नमिता विठ्ठल दांडेकर, सारिका संतोष लाखात, आयुष सिताराम लाखात, सागर नामदेव शेंडे, वंदना शिवराम वळवी, सलोनी शिवराम वळवी, रियांशी संतोष लाखात

नेमका अपघात झाला कसा?
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धाणीवरी येथे वऱ्हाडाच्या टेम्पोचा भीषण असा अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत बारा जणांचा मृत्यू झाला असून 35 पेक्षा अधिक जखमी आहेत. वऱ्हाडाचा टेम्पो हा डहाणूतील बापू गाव येथून धाणीवर येथे साखरपुड्यासाठी येत होता. मात्र धानिवारी येथे विरुद्ध दिशेने येत असतानाच गुजरातहून मुंबईकडे येणारा भरधाव कंटेनर या वऱ्हाडाच्या टेम्पोवरच पलटल्याने हा भीषण अपघात झाला. वऱ्हाडाच्या ट्रकमधून 100 पेक्षा अधिक जण प्रवास करत होते. या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे साखरपुड्यासाठी निघालेल्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या अपघातामध्ये मृत्यू आणि जखमी झालेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती समोर आली नाही. पोलीस सध्या तपास करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number