पुणे: उत्तर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला आहे. या पावसामुळे भीमा नदीला पूर आला आहे. शिरुर तालुक्यातील विठ्ठलवाडी पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे तीन तालुक्यांचा संपर्क तुटला आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस बरसत असल्याने नद्या नाल्यांना पूर आला असून भीमा नदीला आलेल्या पुरामुळे शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी या ठिकाणचा पूल पाण्याखाली गेल्याने शिरूर, दौंड, हवेली या तीन तालुक्यांचा संपर्क तुटलाय, भिमा नदी धोकादायक पातळीवरून वाहत असल्याने प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यात गेल्या 24 तासापासून पाऊस पडत आहे. पावसाने नद्यांना पूर आला आहे. भीमा नदीला आलेल्या पुरामुळे विठ्ठलवाडी पूल पाण्याखाली आला असून यामुळे तीन तालुक्यांचा संपर्क तुटला आहे. भीमा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे शिरूर, दौंड, हवेली अशा तीन तालुक्यांचा संपर्क तुटला असल्याचे बघायला मिळत आहे.
हेही वाचा: ठेकेदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसून आत्मदहनाचा प्रयत्न
भीमा नदीचे वैशिष्ट्य
भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी असून या नदीचा उगम महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे झाला आहे. या नदीची एकूण लांबी 860 किमी आहे, एकूण लांबीपैकी महाराष्ट्रात 451 किमी क्षेत्र आहे. भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. ही नदी महाराष्ट्र राज्याच्या बाहेर कर्नाटकमध्ये कृष्णा नदीला जाऊन मिळते. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे तिला चंद्रभागा म्हणतात. ही नदी आग्नेयेस वाहून कर्नाटकात रायचूरजवळ कृष्णा नदीला मिळते.