Israel Air Strike in Lebanon : इस्रायलचा लेबनानमध्ये एअर स्ट्राइक; 50 लाख डॉलर्सचं बक्षीस असलेला दहशतवादी ठार

इस्रायलने हिजबुल्लाहला मोठा धक्का दिला. इस्रायलच्या हवाई दलाने लेबनानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा म्होरक्या ठार झाला आहे.
Israel Air Strike in Lebanon : इस्रायलचा लेबनानमध्ये एअर स्ट्राइक; 50 लाख डॉलर्सचं बक्षीस असलेला दहशतवादी ठार

Israel Air Strike Lebanon Beirut : गेल्या काही वर्षांपासून पॅलेस्टाईनमधील (Palestine) हमास (Hamas) आणि लेबनानमधील (Lebanon) हिजबुल्लाह (Hezbollah) या सशस्त्र संघटनांसोबत इस्रायलचा संघर्ष सुरू आहे. याच संघर्षातून रविवारी, नोव्हेंबर 23 रोजी, इस्रायलने हिजबुल्लाहला मोठा धक्का दिला. इस्रायलच्या हवाई दलाने लेबनानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा म्होरक्या (Chief of Staff), हायथम अली तबताबाई (Haytham Ali Tabtabai) ठार झाला आहे. इस्रायलच्या संरक्षण दलाने (Israel Defense Forces – IDF) स्वतः वायूदलाच्या हल्ल्यात तबताबाई मारला गेल्याची अधिकृत माहिती दिली आहे. मात्र, यावर हिजबुल्लाह किंवा लेबेनॉनने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मोस्ट वॉन्टेड म्होरक्याचा इतिहास
आयडीएफने दिलेल्या माहितीनुसार, तबताबाई हा सन 1980 पासून हिजबुल्लाहचा सक्रिय सदस्य होता. त्याने हिजबुल्लाहची विशेष सैन्य तुकडी 'रेडवान फोर्स' (Radwan Force), तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच, इस्रायल-लेबनान सीमेवरील युद्धात (Border War) त्याने लेबनानच्या लष्कराचे (Lebanese Army) नेतृत्व केले होते, आणि नंतर तो हिजबुल्लाहचा 'चीफ ऑफ जनरल स्टाफ' (Chief of General Staff) बनला. महत्त्वाचे म्हणजे, अमेरिकेने (USA) सन 2016 मध्ये त्याला 'मोस्ट वॉन्टेड दहशतवादी' म्हणून घोषित केले होते आणि त्याच्यावर तब्बल 5 मिलियन अमेरिकन डॉलर्स (पन्नास लाख डॉलर्स) चे मोठे बक्षीस ठेवले होते.

हेही वाचा – India-US Trade: टॅरिफ वॉरमध्ये भारताचा मास्टरस्ट्रोक! अमेरिकेला मोठा झटका, चीनसोबतचे संबंध नव्या टप्प्यात

लेबनानमध्ये गोंधळ आणि जीवितहानी
या हल्ल्यामुळे लेबनानमधील दहिये (Dahieh) जिल्ह्यातून जाणारा एक प्रमुख महामार्ग उद्ध्वस्त झाला. मोठा स्फोट (Explosion) होताच लोक आपापली घरे आणि इमारतींमधून बाहेर पळू लागले, त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता. लेबनानच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या इस्रायली हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. अनेक इमारती आणि वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तणावात वाढ आणि हिजबुल्लाहचा पाठिंबा
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हिजबुल्लाह आणि इस्रायलमध्ये युद्धाला सुरुवात झाली, जेव्हा हिजबुल्लाहने हमास या दहशतवादी संघटनेला उघडपणे पाठिंबा दिला. हिजबुल्लाह हमासला आर्थिक मदत करत असल्याचा आरोपही इस्रायलने केला होता. त्यानंतर इस्रायलने लेबनानमध्ये पेजर (Pager) हल्ला घडवून आणला होता, ज्यात हिजबुल्लाहशी संबंधित लोकांकडील पेजर्सचा एकाच वेळी स्फोट झाला. यानंतर दोन्ही देशांमधील तणाव खूप वाढला होता. दरम्यान, या हवाई हल्ल्याबद्दल हिजबुल्लाहने किंवा लेबनानने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

हेही वाचा – US pilot On Dubai air show : धक्कादायक! डोळ्यादेखत तेजस क्रॅश, तरीही एअर शो कार्यक्रम सुरूच; आयोजकांच्या निर्णयावर 'त्या' पायलटनं व्यक्त केली नाराजी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version