Wednesday, April 22, 2026 11:02:44 PM

Ajanta Caves Bee Attack: अजिंठा लेणीत पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; 2 परदेशी नागरिकांसह 90 जण जखमी

या हल्ल्यात 2 विदेशी पर्यटकांसह तब्बल 90 जण जखमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या हल्ल्यांच्या मालिकेमुळे पर्यटकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

ajanta caves bee attack अजिंठा लेणीत पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला 2 परदेशी नागरिकांसह 90 जण जखमी

Ajanta Caves Bee Attack: जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणी परिसरात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शनिवारी लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या समूहावर मधमाशांनी अचानक भीषण हल्ला चढवला. या हल्ल्यात 2 विदेशी पर्यटकांसह तब्बल 90 जण जखमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या हल्ल्यांच्या मालिकेमुळे पर्यटकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

दोन महिन्यांतील सातवी घटना; सुरक्षेचा बोजवारा
अजिंठा लेणी परिसरात मधमाशांच्या हल्ल्यांची ही गेल्या दोन महिन्यांतील सातवी घटना आहे. प्रशासनाकडून वारंवार उपाययोजनांचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात पर्यटकांना जीव मुठीत धरून लेणी पाहावी लागत आहे. गेल्या तीन महिन्यांचा विचार केला असता, मधमाशांच्या हल्ल्यात आतापर्यंत एकूण 321 पर्यटक जखमी झाले आहेत. वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे जागतिक स्तरावर अजिंठा लेणीच्या प्रतिमेला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मधमाशांच्या हल्ल्यांची भयानक मालिका :
गेल्या दोन महिन्यांत झालेल्या प्रमुख हल्ल्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
19 फेब्रुवारी: मधमाशांच्या हल्ल्यात 8 पर्यटकांना दुखापत.
21 मार्च: भीषण हल्ल्यात 23 पर्यटक जखमी झाले.
31 मार्च: लेणी परिसरात झालेल्या हल्ल्यात 11 जण जखमी.
2 एप्रिल: अचानक झालेल्या हल्ल्यात 82 पर्यटक जखमी झाले.
4 एप्रिल: 2 विदेशी पर्यटकांसह 90 पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला.

हेही वाचा - Bhandara Tiger Attack: भंडारा जिल्ह्यात वाघाची दहशत! 15 दिवसांत 3 जणांवर हल्ला; गावकरी आक्रमक, वनविभागाकडून शोध मोहीम सुरू

पर्यटकांमध्ये दहशतीचे वातावरण
लेणी क्रमांक 1 ते 26 च्या दरम्यान अनेक ठिकाणी मधमाशांची मोठी पोळी आहेत. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे किंवा पर्यटकांच्या गोंगाटामुळे या माशा बिथरत असल्याचे सांगितले जात आहे. आजच्या घटनेनंतर जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री