Wednesday, June 18, 2025 02:11:45 PM

ई-केवायसी न केल्यास रेशनकार्डमधून नाव कमी होणार

रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ई-केवायसी न केल्यास रेशनकार्डमधून नाव कमी होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकराच लवकर ई-केवायसी करणे गरजेचे आहे.

ई-केवायसी न केल्यास रेशनकार्डमधून नाव कमी होणार

छत्रपती संभाजीनगर : रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ई-केवायसी न केल्यास रेशनकार्डमधून नाव कमी होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकराच लवकर ई-केवायसी करणे गरजेचे आहे.

राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या शिधापत्रिका ई-केवायसीसाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत ई-केवायसी न केल्यास संबंधित रेशनकार्डधारकांचे नाव शिधापत्रिकेतून कमी करण्यात येऊन त्यांचा रेशन पुरवठा बंद होणार आहे. त्यामुळे शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसी करुन घ्यावी असे आवाहन पुरवठा निरक्षण अधिकारी कैलास बहुरे यांनी केले आहे. 

हेही वाचा : हगवणे पिता-पुत्रांना आसरा देणाऱ्या 5 जणांना अटक

पैठण तालुक्यातील 2 लाख 49 हजार 320 शिधापत्रिका धारकापैकी 80 हजार 481 लाभार्थांची ई-केवायसी बाकी असून 1 लाख 69 हजार 733 लाभार्थांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे अशी माहिती बहुरे यांनी दिली आहे. 


सम्बन्धित सामग्री