प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातील अंडा सेलमध्ये रवानगी झालीय. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातील अंडा सेलमध्ये रवानगी झालीय. अंडा सेलमध्ये प्रशांत कोरटकरवर दहा सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणारे. शिवाय दोन कारागृह कर्मचारी देखील प्रशांत कोरटकरवर सतत लक्ष ठेवून राहणार आहेत.
सुनावणी वेळी प्रशांत कोरटकरवर दोन वेळा हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी कारागृहात सुरक्षित कोठडी देण्याची न्यायालयाला विनंती केली होती. यानंतर आता वकिलांनी केलेल्या विनंतीनंतर कोरटकरला अंडासेलमध्ये स्वतंत्र कोठडीत ठेवण्यात आले आहे. एरवी सराईत आणि बॉम्बस्फोट अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींनाच अंडा सेलमध्ये ठेवलं जातं मात्र आता प्रशांत कोरटकर याला देखील अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलं आहे.
हेही वाचा: राज्यात उन्हाचा तडाखा वाढला
'अंडा सेल' म्हणजे काय ?
1) 'अंडा सेल' हा तुरुंगवासाचा अतिशय भयानक प्रकार आहे.
2) अतिशय गंभीर आरोपातील गुन्हेगारांसाठी 'अंडा सेल'.असते
3) कुख्यात गुंड, अतिरोकी, दहशतवादी अशा गुन्हेगारांना अंडा सेलमध्ये ठेवतात.
4) वीज, प्रकाश नसलेली अंड्याच्या आकाराची अंधारी कोठडी असते
5) चोवीस तास आरोपीला कोठडीत राहावं लागतं. सगळे विधी कोठडीतच उरकायचे असतात.
6) गुन्हेगाराचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठीचं 'अंडा सेल'ची निर्मिती.
7) 'अंडा सेल'च्या बाहेर मोठी सुरक्षा व्यवस्था असते.
दरम्यान न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातील अंडा सेलमध्ये रवानगी करण्यात आलीय. अंडा सेलमध्ये प्रशांत कोरटकर वर दहा सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर असणारे. शिवाय दोन कारागृह कर्मचारी देखील सतत प्रशांत कोरटकरवर लक्ष ठेवून राहणार आहे.