राष्ट्रवादीच्या कालच्या बैठकीत पार्थ पवार यांच्या कार्यप्रणालीवर आमदारांची नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे. काल राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक झाली. विशेष म्हणजे ही बैठकही पार्थ पवारांविना पार पडली. या बैठकीत पार्थ पवारांविषयी तक्रारी करण्यात आल्या आहेत.
‘पार्थ पवार यांनी वरिष्ठाने विचारून निर्णय घेतले पाहिजे. सर्वांना सोबत घेत अनुभवी आणि वयाचा मान देत काम करावे’ असं म्हणत, पार्थ यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरून कालच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदारांनी सुनेत्रा पवार यांच्या समोर आपली नाराजी बोलून दाखवली. यासोबतच पक्षाची बाजून सक्षमपणे मांडायला हवी.
दोन राष्ट्रवादीचे विलिनीकरण न करता अर्थखाते लवकरात लवकर पुन्हा राष्ट्रवादीकडे यावे अशी मागणीही अनेक आमदारांनी सुनेत्रा पवार यांच्यासमोर केल्याची माहिती आहे. तसेच महायुतीच्या घटक पक्षातील अनेक नेत्यांकडून योग्य मदत मिळत नाही आणि स्थानिक राजकारणाचा परिणाम राष्ट्रवादीच्या पक्षावर होऊ नये याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
त्यानंतर पार्थ आणि जय दोघेही पक्षातली वरिष्ठ नेत्यांसोबत समतोल राखतील. तसेच पार्थ आणि जय पवार यांनी ही बैठकीत सर्वांसोबत काम समतोल काम करण्याचे आश्वासन सुनेत्रा पवारांनी दिले. प्रत्येक घरोघरी पोहचण्याची पक्षाची गरज असून दुष्काळ दौरा सर्व आमदार करतील आणि त्याची माहिती सुनेत्रा पवारांना देतील असे आदेश दिले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्या मुंबईतील देवगिरी निवासस्थानी संध्याकाळी सात वाजता पक्षातील सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. दरम्यान उद्या सर्व आमदारांसोबत समवेत संवाद केला जाणार आहे. या बैठकीत आमदारांशी पक्षाच्या संघटनात्मक परिस्थितीवर चर्चा केली जाणार आहे. तसेच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पक्षातील मंत्र्यांकडून दौरे केले जाणार असल्याची माहिती आमदारांना दिली जाण्याची शक्यता आहे.