बॉलिवूडमध्ये आयकर विभागाची मोठी धाड! रकुलप्रीत, वाशू भगनानी आणि पॅनोरमा स्टुडिओजशी संबंधित 12 ठिकाणी छापेमारी

अभिनेत्री रकुलप्रीत, निर्माता वाशू भगनानी आणि पॅनोरमा स्टुडिओजशी संबंधित जवळपास १२ ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे.

बॉलिवूडमध्ये आयकर विभागाची मोठी धाड! रकुलप्रीत, वाशू भगनानी आणि पॅनोरमा स्टुडिओजशी संबंधित 12 ठिकाणी छापेमारी

मुंबई : बॉलिवूड आणि चित्रपटसृष्टीशी संबंधित आर्थिक व्यवहारांवर आयकर विभागाने मोठी कारवाई सुरू केली आहे. अभिनेत्री रकुल प्रीत सिंग, चित्रपट निर्माता वाशू भगनानी आणि पॅनोरमा स्टुडिओजशी संबंधित मुंबईतील जवळपास १२ ठिकाणी आयकर विभागाने एकाच वेळी छापेमारी सुरू केली. सकाळी सुमारे १० वाजल्यापासून ही कारवाई सुरू असून विविध ठिकाणी अधिकाऱ्यांकडून कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आयकर विभागाने बॉलिवूड आणि फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित व्यक्ती तसेच कंपन्यांविरोधात विशेष तलाशी मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत विशेषतः चित्रपट प्रकल्पांच्या नावाखाली परदेशात कथितरीत्या पाठवण्यात आलेल्या निधीची चौकशी केली जात असल्याचे समोर आले आहे.

आयकर विभागाच्या प्राथमिक तपासात काही आर्थिक व्यवहार आणि करासंदर्भातील कथित अनियमितता तपासाच्या केंद्रस्थानी असल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार संबंधित व्यक्ती आणि कंपन्यांच्या कार्यालयांसह इतर ठिकाणांवरील कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.

दरम्यान, रकुल प्रीत सिंग, वाशू भगनानी आणि पॅनोरमा स्टुडिओजशी संबंधित विविध ठिकाणी अधिकाऱ्यांकडून शोधमोहीम अद्याप सुरू आहे. तपास पथक आर्थिक व्यवहारांची नोंद, कर विवरणपत्रे आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे तपासत असल्याची माहिती मिळत आहे.

चित्रपटसृष्टीतील मोठ्या नावांशी संबंधित ही कारवाई सुरू झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. मात्र, आयकर विभागाकडून या कारवाईबाबत सविस्तर अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमक्या कोणत्या व्यवहारांच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया काय असेल, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सध्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित ठिकाणी तपास सुरू असून, या प्रकरणात पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number