रेल्वेची मोठी भेट! 2 विशेष अमृत भारत ट्रेन धावणार; तुमच्या शहराचा समावेश आहे का?

Big Railway Update : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे दोन विशेष अमृत भारत ट्रेन चालवणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या ट्रेनचा मार्ग, कोणत्या स्थानकांवर थांबे असणार आणि वेळापत्रक काय असेल, याबाबत जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दिवाळीपूर्वी प्रवाशांसाठी मोठी भेट
Two Special Amrit Bharat Trains

दिवाळी आणि छट पूजेसाठी गावी जाणाऱ्या असंख्य प्रवाशांसाठी रेल्वेने मोठी भेट दिलेली आहे. सुरत आणि मधुबनी या दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेने 2 विशेष अमृत भारत ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. सणासुदीच्या काळात होत असलेली गर्दी लक्षात हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.

दिवाळीपूर्वी प्रवाशांसाठी मोठी भेट
मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही गाड्या उधना (सुरत) ते जयनगर (मधुबनी) या दरम्यान धावणार आहे. या सर्व गाड्यांमध्ये 8 स्लीपर, 11 जनरल, 1 एसएलआरडी आणि 1 पॅन्ट्री कार असे एकून 22 डबे असणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या गाड्या पूर्णपणे अनारक्षित असणार आहेत, त्यामुळे प्रवाशांना आरक्षणाची गरज भासणार नाही.

हेही वाचा-प्रतीक्षा संपणार! पनवेल-कर्जत लोकलच्या शुभारंभाबाबत मोठी अपडेट; डब्यांची संख्याही समोर

कसं असेल पहिल्या ट्रेनचे वेळापत्रक
ट्रेन क्रमांक 09073 उधना ते जयनगर ही गाडी 18 आणि 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी उधनाहून सुटेल आणि मंगळवारी सकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी जयनगरला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक 09074 जयनगर ते उधना ही गाडी 20 आणि 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता सुटेल आणि गुरुवारी सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी उधनाला पोहोचेल.

दुसऱ्या ट्रेनचे वेळापत्रक
ट्रेन क्रमांक 09071 उधना ते जयनजगर ही गाडी 18,25 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी सुटेल आणि मंगळवारी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी जयनगरला पोहोचेल. तर गाडी क्रमांक 09072 जयनगर ते उधना ही 20,27 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुटेल आणि गुरुवारी सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी उधनाला पोहोचेल.

असे असतील थांबे
या गाड्या वडोदरा, रतलाम, उज्जैन,झांशी, प्रयागराज, दीनदयाल उपाध्याय जंक्शन, दानापूर, पाटलीपुत्र, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, दरभंगा आणि मधुनबी या प्रमुख स्थानकांवर थांबणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version